coronavirus : नांदेडमध्ये आणखी पाच बाधित आढळले; एकूण रुग्णसंख्या १४३
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 10:44 IST2020-05-29T10:42:48+5:302020-05-29T10:44:24+5:30
नांदेडमध्ये आणखी पाच बाधित आढळले

coronavirus : नांदेडमध्ये आणखी पाच बाधित आढळले; एकूण रुग्णसंख्या १४३
नांदेड: जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, शुक्रवारी सकाळी १०४ स्वॅब नमुण्यांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले. यातील ९७ अहवाल निगेटिव्ह आले असले तरी पाच जण कोरोनाबाधित आढळल्याने एकूण रूग्णसंख्या १४३ एवढी झाली आहे.
नव्याने आढळलेल्या पाच रुग्णात नांदेड शहरातील मिल्लतनगर आणि लोहरगल्ली येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. तर मुखेड येथील एक ४० वर्षीय महिलेलाही कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. तर दोन रुग्ण हिंगोली जिल्हयातील कसबे येथील असून येथील शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.