CoronaVirus : नांदेडकरांना मोठा दिलासा; मयत कोरोना संशयित तरुणीचा अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 14:10 IST2020-04-11T14:06:23+5:302020-04-11T14:10:10+5:30
तीन दिवसांपूर्वी कोरोना कक्षात तरुणीचा मृत्यू झाला होता

CoronaVirus : नांदेडकरांना मोठा दिलासा; मयत कोरोना संशयित तरुणीचा अहवाल निगेटिव्ह
नांदेड- जिल्ह्यात आतापर्यंत एकही कोरोना चा पोसिटीव्ही रुग्ण आढळला नाही. त्यात तीन दिवसापूर्वी रुग्णालयातील कोरोना कक्षात दाखल झालेल्या एका तरुणी चा मृत्यू झाला होता. त्यामुळे खळबळ उडाली होती. शनिवारी सकाळी या तरुणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्वांचाच जीव भांड्यात पडला.
नांदेड जिल्ह्यातील आतापर्यंत 171 जनांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील 150 जणांचे अहवाल यापूर्वी च निगेटिव्ह आले आहेत. बुधवारी आणखी 21 जनांसाजे अहवाल पाठविण्यात आले होते. त्यात कोरोना संशयित असलेल्या एका तरुणीचा समावेश होता.
या तरुणीचा उपचारा दरम्यान शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. सर्व यंत्रणा त्या तरुणी चा अहवाल काय येतो याकडे लक्ष देऊन होते. शनिवारी सकाळी या मयत तरुणीसह इतर 17 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले, त्यामुळे सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.