coronavirus : नांदेडकरांच्या चिंतेत भर; चार आमदारांनंतर आता खासदार चिखलीकर ही कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 11:58 IST2020-08-07T10:41:34+5:302020-08-07T11:58:26+5:30

खासदारांवर औरंगाबाद येथे उपचार सुरू आहेत.

coronavirus: After MLAs in Nanded, now MP is corona positive | coronavirus : नांदेडकरांच्या चिंतेत भर; चार आमदारांनंतर आता खासदार चिखलीकर ही कोरोनाबाधित

coronavirus : नांदेडकरांच्या चिंतेत भर; चार आमदारांनंतर आता खासदार चिखलीकर ही कोरोनाबाधित

ठळक मुद्देजिल्ह्यात आतापर्यंत चार आमदाराना कोरोनाची लागण झाली होती. जिल्हा परिषद सदस्य असलेल्या खासदार पुत्राला कोरोना झाल्याचे स्पस्ट झाले

नांदेड- जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या तीन हजारावर गेली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील चार आमदारांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यात आता खासदार प्रताप पाटील चिखलीकर कोरोनाबाधित निघाले. त्यांच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरू आहेत. 

जिल्ह्यात आतापर्यंत चार आमदारांना कोरोनाची लागण झाली होती. तर राज्यातील मंत्री अशोक चव्हाण बाधित निघाले होते. सध्या एका आमदारावर मुंबई येथे उपचार सुरू आहेत.

काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद सदस्य असलेल्या खासदार पुत्राला कोरोना झाल्याचे स्पस्ट झाले होते. उपचारासाठी त्यांना औरंगाबाद येथे दाखल करण्यात आले. त्यानंतर चिखलीकर यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची तपासणी करण्यात आली. यात खासदार चिखलीकर ही कोरोनाबाधित निघाले. त्यांच्यावर औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

Web Title: coronavirus: After MLAs in Nanded, now MP is corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.