CoronaVirus : कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळ्यानंतर अबचलनगर परिसर कंटेनमेंट झोन म्हणून केला सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 11:52 IST2020-04-27T11:51:45+5:302020-04-27T11:52:06+5:30

रुग्णावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC) येथे उपचार सुरु आहेत.

CoronaVirus : Abchalnagar area sealed as containment zone | CoronaVirus : कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळ्यानंतर अबचलनगर परिसर कंटेनमेंट झोन म्हणून केला सील

CoronaVirus : कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळ्यानंतर अबचलनगर परिसर कंटेनमेंट झोन म्हणून केला सील

नांदेड :-  कोव्हीड-१९ च्या अनुषंगाने  नांदेड शहरात अबचलनगर भागातील ४४ वर्षीय कोरोना संशयित रुग्णाचा अहवाल रविवार २६ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला आहे. त्या रुग्णावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC) येथे उपचार सुरु आहेत.

 नांदेड शहरातील अबचलनगर हा भाग कंटेनमेंट झोन (अटकाव) म्‍हणून सील करण्यात आला आहे. या सील करण्यात आलेल्या भागातील जनतेने घरातच रहावे. या भागात रुग्णाच्या  संपर्कात आलेल्या संभावित संशयीतांच्या तपासणीसाठी वैद्यकीय पथके आणि पोलिस तैनात करण्यात आली आहेत. जनतेने घाबरुन न जाता, प्रशासनाने दिलेल्‍या निर्देशाचे पालन करावे आणि अत्‍यंत आवश्‍यक कारणाशिवाय घराबाहेर पडु नये, घरातच राहून कोरोना विरुद्धच्या लढ्यात जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

Web Title: CoronaVirus : Abchalnagar area sealed as containment zone