coronavirus : नांदेडमध्ये २१ बाधित रुग्ण आढळल्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 19:01 IST2020-06-11T19:00:39+5:302020-06-11T19:01:36+5:30

मुखेड शहरातही कोरोनाचा शिरकाव; होळकरनगर आणि विठ्ठलनगर भागात आढळले बाधित

coronavirus: 21 corona infected patients found in Nanded | coronavirus : नांदेडमध्ये २१ बाधित रुग्ण आढळल्याने खळबळ

coronavirus : नांदेडमध्ये २१ बाधित रुग्ण आढळल्याने खळबळ

नांदेड : गुरुवारचा दिवस नांदेडकरांसाठी मोठा धक्का देणारा ठरला. एकाच दिवसात तब्बल २१ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या नव्या रुग्णामुळे नांदेडातील कोरोनाबाधितांची संख्या २२४ वर जावून पोंहचली असून ११ बाधितांचा यापूर्वीच उपचारास प्रतिसाद न दिल्याने मृत्यू झालेला आहे.

मध्यंतरी कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाला असे वाटत असतानाच जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढू लागली आहे. मंगळवारी नांदेडमध्ये एक बाधित डॉक्टर आढळून आल्यानंतर बुधवारचा दिवसही नांदेडकरांची काळजी वाढविणाराच ठरला होता. बुधवारी १० नवे रुग्ण आढळून आले होते तर दोन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. गुरुवारी सायंकाळी स्वॅब तपासणी नमुन्यांचे ८९ अहवाल प्राप्त झाले. यातील तब्बल २१ अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले.

नव्या बाधितामध्ये चौफाळा, फरांदेनगर, खोजा कॉलनी, उमर कॉलनी आदी भागातील प्रत्येकी एक तर देगलूर नाका भागातील दोन, इतवारा भागातील पाच आणि गुलजार बाग भागातील आठ रुग्णांचा समावेश आहे. याबरोबरच मुखेड शहरातही कोरोनाने शिरकाव केला असून शहरातील होळकरनगर आणि विठ्ठलनगर भागातील प्रत्येकी एकजण पॉझिटिव्ह आढळला आहे. सध्या ७४ बाधित रुग्णावर जिल्ह्यातील विविध कोवीड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे.

Web Title: coronavirus: 21 corona infected patients found in Nanded