coronavirus : नांदेडमध्ये कोरोनाचे आणखी १६ रुग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 18:53 IST2020-07-01T18:51:49+5:302020-07-01T18:53:21+5:30

जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ३९१ एवढी झाली आहे.

coronavirus: 16 more coronavirus patients found in Nanded | coronavirus : नांदेडमध्ये कोरोनाचे आणखी १६ रुग्ण आढळले

coronavirus : नांदेडमध्ये कोरोनाचे आणखी १६ रुग्ण आढळले

ठळक मुद्देकोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या २९२ १७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू

नांदेड : मंगळवारी कोरोनाने नांदेडला जबर धक्का दिला़ एकाच दिवशी १४ रुग्ण आढळले होते़ त्यानंतर बुधवारचा दिवसही नांदेडकरांची चिंता वाढविणाराच ठरला आहे़ आज एकाच दिवशी १६ रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ३९१ एवढी झाली आहे.

बुधवारी ८७ अहवाल प्राप्त झाले़ त्यातील ५६ अहवाल निगेटिव्ह आले़ मात्र शहरातील बाफना आणि आंबेडकर नगर परिसरात प्रत्येकी दोन तर असर्जन परिसरात चार रुग्ण आढळले़  तर विनायक नगर, वसंतनगर, गाडीपुरा, आनंदनगर आणि अनिकेतनगर भावसार चौक येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला़ याबरोबरच कंधार तालुक्यातील उमरज येथे एक आणि मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथे दोन रुग्ण आढळून आले आहेत़ 

दरम्यान, बुधवारी नांदेड शहरातील कोविड केअर सेंटरमधून सात जणांना तर मुखेड येथून एकाला तसेच औरंगाबाद येथील संदर्भित एका रुग्णालाही उपचारानंतर सुटी देण्यात आल्याने कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या आता २९२ एवढी झाली आहे़ तर १७ रुग्णांचा यापूर्वीच उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Web Title: coronavirus: 16 more coronavirus patients found in Nanded