Coronavirus : नांदेडमध्ये आणखी १० कोरोनाबाधित आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 06:44 PM2020-06-18T18:44:20+5:302020-06-18T18:44:36+5:30

जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या २९६ एवढी झाली आहे. 

Coronavirus : 10 more coronaviruses were found in Nanded | Coronavirus : नांदेडमध्ये आणखी १० कोरोनाबाधित आढळले

Coronavirus : नांदेडमध्ये आणखी १० कोरोनाबाधित आढळले

Next

नांदेड : गुरुवारी सायंकाळी  स्वॅब नमुना तपासणीचे २२६ अहवाल प्राप्त झाले़ यापैकी १९८ अहवाल निगेटीव्ह आले़ तर १० अहवाल पॉझीटीव्ह आल्याने जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या २९६ एवढी झाली आहे. 

या नव्या १० रुग्णांमध्ये आठ रुग्ण नांदेड शहरातील असून एक रुग्ण मुखेड येथील तर अन्य एक रुग्ण हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील आहे़ आजवर जिल्ह्यातील १८१ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे़ तर १३ जणांचा यापूर्वीच उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे़ सध्या १०२ रुग्णांवर सध्या जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत़ यापैकी तीन रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़नीळकंठ भोसीकर यांनी सांगितले़ 

दरम्यान, गुरुवारी आणखी ४५ जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले असून याचे अहवाल शुक्रवारी सायंकाळपर्यंत प्राप्त होतील, असेही भोसीकर यांनी सांगितले़ 

Web Title: Coronavirus : 10 more coronaviruses were found in Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.