कोरोना योद्धा आलुरे कुटुंबियांना ६० लाखांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:10 IST2021-02-05T06:10:40+5:302021-02-05T06:10:40+5:30
नांदेड - कोरोना काळात कर्तव्य बजावताना मयत झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना शासनाने ६० लाख रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर केले होते. नांदेड ...

कोरोना योद्धा आलुरे कुटुंबियांना ६० लाखांची मदत
नांदेड - कोरोना काळात कर्तव्य बजावताना मयत झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना शासनाने ६० लाख रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर केले होते. नांदेड पोलीस दलातील रामलू गंगाराम आलुरे या पोलीस कर्मचाऱ्याचा कर्तव्यावर असताना कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई सानुग्रह अनुदान म्हणून ६० लाख रुपयांचा धनादेश पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या हस्ते देण्यात आला. मुक्रमाबाद पोलीस ठाण्यातील पोलीस हेडकाॅन्स्टेबल रामलू गंगाराम आलुरे यांना त्रास होत असल्याने ८ ऑक्टोबर २०२० रोजी रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणण्यात येत होते. परंतु, रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. कोरोनामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्याबाबतचा अहवाल पोलीस महासंचालक कार्यालयाला पाठविण्यात आला होता. शासनाकडून आलुरे कुटुंबियांना ६० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर झाले. बुधवारी पोलीस अधीक्षक शेवाळे यांच्या हस्ते आलुरे यांची पत्नी शोभा आलुरे यांना २० लाख रुपये, मुलगी सुनीता आणि कविता यांना प्रत्येकी २० लाख रुपयांचे धनादेश देण्यात आले.