कोरोना पॉझिटिव्ह गरोदर महिला सैरभैर, अपवाद वगळता बहुतांश रुग्णालयांचा दाखल करून घेण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:16 IST2021-04-12T04:16:30+5:302021-04-12T04:16:30+5:30

दहाच मिनिटात झाला त्या गरोदर महिलेचा मृत्यू एका खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या गरोदर महिलेला अत्यवस्थ वाटू लागल्याने ऑक्सिजन लावण्यात ...

Corona-positive pregnant women refuse to be admitted to most hospitals, with few exceptions | कोरोना पॉझिटिव्ह गरोदर महिला सैरभैर, अपवाद वगळता बहुतांश रुग्णालयांचा दाखल करून घेण्यास नकार

कोरोना पॉझिटिव्ह गरोदर महिला सैरभैर, अपवाद वगळता बहुतांश रुग्णालयांचा दाखल करून घेण्यास नकार

दहाच मिनिटात झाला त्या गरोदर महिलेचा मृत्यू

एका खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या गरोदर महिलेला अत्यवस्थ वाटू लागल्याने ऑक्सिजन लावण्यात आला. परंतु, अचानक झटके येऊन तीन महिन्यांच्या गरोदर असलेल्या या महिलेचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना कळल्यानंतर महिलेच्या आई अन् पतीने एकच आक्रोश केला. वेळीच निदान अन् उपचार झाले असते तर कदाचित ही मन हेलावून टाकणारी घटना घडली नसती.

कोरोना महिलेचे पहिलेच सिझर, बाळ अन् आई सुखरूप

बाळंत कळा सुरू झाल्याने रुग्णालयात भरती केलेल्या महिलेच्या रक्तचाचण्या अहवाल पाहून एका खासगी रुग्णालयाने बाळंतपण करण्यास डॉक्टरांनी नकार दिला. बीपी हाय असून रक्ताचीही कमतरता असल्याचे कारण देत डॉक्टरांनी सरकारी तसेच हायर सेंटरचा रस्ता दाखवला. मध्यरात्रीची वेळ असल्याने सैरभैर होऊन रुग्णांच्या नातेवाइकांनी जवळपास सहा दवाखान्यांमध्ये विचारणा केली, परंतु कोरोना पॉझिटिव्ह त्यात रक्त कमी आणि दिवस पूर्ण होऊन गेल्याने रिस्क असल्याचे कारण देत प्रत्येक डॉक्टरांनी सरकारी रुग्णालयाचाच रस्ता दाखवला. अशा परिस्थितीत शसकीय रुग्णालयात चौकशी करण्यात आली, परंतु त्याठिकाणी आयसीयू बेड उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. या सर्व धावपळीत रात्र गेली. त्यानंतर नातेवाइकांनी डॉ.अंकुश देवसरकर यांच्याशी संपर्क साधून परिस्थिती सांगितली. धोकादायक परिस्थिती असलेल्या दोन जिवांच्या महिलेवर उपचार करण्याचे औदार्य डॉ. शुभांगी देवसरकर यांनी दाखविले. अगोदरच वेळ गेलेला असल्याने कोणत्याही फाॅर्मिलिटी अथवा पुन्हा त्यात त्या चाचण्या न करता ताबडतोब भरती करून घेतले. नऊ महिने नऊ दिवसांपेक्षा अधिक कालावधी झाल्याने अन् बाळाच्या हृदयाचे ठोके कमी होऊ लागल्याने सिझेरियनचा निर्णय घेतला. वेळीच उपचार मिळाल्याने बाळ अन् बाळंतीण सुखरूप आहे. बाळाचे वजन साडेचार किलो भरले असून त्यास घरी पाठविण्यात आले. तर महिलेला पुढील उपचारासाठी रुग्णालयातच स्वतंत्र रूममध्ये भरती आहे. महिलेवर डॉ. शुभांगी देवसरकर यांनी तर बाळावर डॉ. अमोल कलेटवाड यांनी उपचार केले.

Web Title: Corona-positive pregnant women refuse to be admitted to most hospitals, with few exceptions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.