नांदेड जिल्ह्यात कोरोना बळींची संख्य ५०० च्या उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 06:35 PM2020-10-23T18:35:12+5:302020-10-23T18:36:43+5:30

आतापर्यंत १६ हजार ९०६ जणांची कोरोनावर मात

Corona death toll rises to 500 in Nanded district | नांदेड जिल्ह्यात कोरोना बळींची संख्य ५०० च्या उंबरठ्यावर

नांदेड जिल्ह्यात कोरोना बळींची संख्य ५०० च्या उंबरठ्यावर

Next
ठळक मुद्देशुकवारी आणखी तिघांचा मृत्यू १०४३ जणांवर उपचार सुरु

नांदेड : १६०० पेक्षा अधिक चाचण्या करुनही अवघे ८९ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने घटत आहे़ ही बाब दिलासादायक असली तरी मागील चोवीस तासात आणखी तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने कोरोना बळींची संख्या ५०० च्या उंबरठ्यावर पोहोंचली असून शुक्रवारपर्यंत ४९८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे़

आॅगस्ट महिन्यात कोरोना बाधितांची संख्या दररोज ३०० पेक्षा अधिक निघत होती़ मात्र आॅक्टोबर महिन्यात नव्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने घट झाल्याचे दिसून येत आह़े़  शुक्रवारी तर १६२५ पैकी केवळ ८९ अहवाल पॉझिटिव्ह आले असून तब्बल १५११ अहवाल निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे़ त्याचवेळी औषधोउपचारानंतर रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे़ मागील २४ तासात १७० जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली़ त्यामुळे आजवर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १६ हजार ९०६ एवढी झाली आहे़ शुक्रवारी कोरोनावर मात केलेल्यामध्ये विष्णुपूरी महाविद्यालयातील ७ जिल्हा रुग्णालयातील ११, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन आणि होम आयोसेलेशनमधील ९० रुग्णांसह किनवट ४, धर्माबाद ५, मुखेड, माहूर कंधार प्रत्येकी १, बिलोली ४़, नायगाव ५, लोहा २, हदगाव ४ आणि खाजगी रुग्णालयात उपचार घेतलेल्या ३५ जणांचा समावेश आहे़

दरम्यान मागील २४ तासात आणखी तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला़ यामध्ये हडको येथील ५७ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे़ त्यांच्यावर विष्णुपूरीतील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु होते़ तर याच ठिकाणी उपचार सुरु असलेल्या भोकर येथील ७० वर्षीय पुरुषाचाही उपचारास प्रतिसाद न दिल्याने मृत्यू झाला असून सिडको येथील ५० वर्षीय पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ४९८ एवढी झाली आहे़

१०४३ जणांवर उपचार सुरु
कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे़ दुसरीकडे बाधित रुग्णांची संख्या घटत असल्याने सद्य:स्थितीत जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटरमध्ये केवळ १०४३ जणांवर उपचार सुरु आहेत़ यामध्ये सर्वाधिक १५१ रुग्ण विष्णुपूरी रुग्णालयात दाखल आहेत़ तर एनआरआय पंजाब भवन, महसूल भवन आणि होम आयसोलेशनमध्ये असलेल्या ५१२ जणांवर उपचार सुरु असून जिल्हा रुग्णालय ४७, जिल्हा रुग्णालया नवीन इमारत ३०, हदगाव ७, नायगाव १४, बिलोली १५, मुखेड ६, मांडवी ७, देगलूर ८, लोहा ९, मुदखेड ७, माहूर २३, किनवट २६, धर्माबाद १०, उमरी ७, कंधार १०, अर्धापूर १५, भोकर ११,हिमायतनगर १ तर खाजगी रुग्णालयात १२४ जणांवर उपचार सुरु आहेत़

Web Title: Corona death toll rises to 500 in Nanded district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.