शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
4
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
5
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
6
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
7
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
8
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
9
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
10
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
11
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
12
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
13
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
14
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
15
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
16
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
17
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
18
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
19
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
20
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप

कोरोना, केंद्राचा आर्थिक असहकार; संकटांचा सामना करत महाविकास आघाडी दमदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2021 12:33 IST

Ashok Chavhan On Mahavikas Aaghdi Govt: केंद्रातील भाजप सरकारने महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

नांदेड : राज्यात महाविकास आघाडी ( Mahavikas Aaghadi ) सरकारच्या काळातच कोरोना ( Corona Virus ) महामारीचे संकट आणि केंद्र सरकारने राज्याशी पुकारलेला असहकार या दोन्ही संकटांचा युद्धपातळीवर मुकाबला करत राज्य सरकार टिकून आहे (Mahavikas Aghadi is strong by facing adversity) . आज सरकारची दोन वर्ष पूर्ण झाली असून, जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्यात सरकारला यश आले आहे. यापुढेही आत्मविश्वासाने आणि मजबुतीने महाविकास आघाडी जनतेचे काम करेल, असे मत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण ( Ashok Chavhan ) यांनी व्यक्त केले. (Ashok Chavhan On Mahavikas Aaghdi Govt's 2yrs ) 

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी रविवारी नांदेड येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या कार्याचा लेखाजोखा मांडला. कोरोना या जागतिक महामारीमुळे राज्याच्या तिजोरीला १ लाख ५७ हजार कोटींचा फटका बसला. परंतु, या परिस्थितीतही नैसर्गिक संकटात सापडलेल्या सामान्य जनतेला खंबीरपणे साथ देण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले. यामध्ये जागतिक महामारीचा सामना करण्यासाठी अल्पावधीतच हजारो खाटांची उपलब्धता करुन लाखो नागरिकांचे प्राण वाचविण्याचे काम या सरकारने केले. त्याचबरोबर शेतकरी कर्जमाफी योजनेत ३०.७७ लाख शेतकऱ्यांना १९ हजार ६४४ कोटी रुपयांचा लाभ दिला. पिकांच्या नुकसानभरपाईपोटी एनडीआरएफच्या निकषाहूनही अधिक मदत देणारे दहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात जाहीर केल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले. क्यार, महाचक्रीवादळ, निसर्ग चक्रीवादळ यातून बाधित झालेल्या नागरिकांना ८ हजार ३५६ कोटी तर गारपीट, अवेळी पाऊस, शेतीचे नुकसान, अतिवृष्टी आदींचा फटका बसलेल्या नागरिकांना ३ हजार ३९६ कोटी असे एकूण ११ हजार ७५२ कोटी रुपये देण्याचे काम सरकारने केले असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

राज्य सरकारची केंद्राकडून आर्थिक कोंडीमहाविकास आघाडी सरकार कोरोना या महामारीबरोबरच नैसर्गिक आपत्तींचा सामना करत असताना, केंद्राने राज्याच्या पाठीमागे उभे राहणे गरजेचे आहे. परंतु, केंद्रातील भाजप सरकारने महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केला. जीएसटीचा राज्याचा वाटा आणि परतावा वेळेवर दिला नाही. सुशांतसिंग राजपूत आत्महत्या, पालघर येथील साधूंचे हत्याकांड अशा प्रकरणात जाणीवपूर्वक राज्य सरकारची बदनामी केले. सरकारमधील नेत्यांच्या पाठीमागे केंद्रीय तपास यंत्रणाचा ससेमिरा लावला. परंतु, सरकारच्या प्रामाणिकपणामुळे आजघडीला राज्यात झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये जनतेने भाजपला जागा दाखवून देण्याचे काम केले असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

एनसीबीच्या कारवाईचे चव्हाणांकडून समर्थननांदेड जिल्ह्यात एनसीबीच्या पथकाने गांजाप्रकरणी केलेल्या कारवाईचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी समर्थन केले. जनहितासाठी अशा प्रकारच्या कारवाई होणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. तसेच राज्यात ज्याठिकाणी दंगली घडविण्याचा कट काही समाजकंटक तसेच काही संघटनांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असून, दोषींवर निश्चितपणे कारवाई होईल, असेही चव्हाण म्हणाले.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेCentral Governmentकेंद्र सरकार