बाईक-सायकलच्या धडकेनंतर दोन गट भिडले; मध्यस्थाच्या डोक्यात बसला कुऱ्हाडीचा घाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 14:16 IST2021-02-24T14:13:40+5:302021-02-24T14:16:05+5:30
सायकलवरून घराकडे येताना बाईकवरील दोघांनी शेतकऱ्यास धडक दिली

बाईक-सायकलच्या धडकेनंतर दोन गट भिडले; मध्यस्थाच्या डोक्यात बसला कुऱ्हाडीचा घाव
नांदेड: लोहा तालुक्यातील शिवणी जामगा गावात दोन गटात हाणामारी झालीय. या हाणामारीत संदीप दुधमल हा गंभीर जखमी झालाय. या हाणामारीचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे. या घटनेमुळे शिवणी जामगा शिवारात प्रचंड तणाव असून पोलिसांनी बंदोबस्त वाढवलाय.
शिवनी येथील संदीप दुधमल शेतावरुन साइकलवरुन घरी येत होते. दरम्यान, रस्त्यात बसवेश्वर बोंमनाळे व प्रल्हाद जामगे हे दोघे मोटारसायकलवरून घरी येताना संदीप दुधमालच्या सायकलला धडक मारली. त्या नंतर संदीपने त्यांच्याशी वाद घातला. यावेळी दोघांनी जातीय शिवीगाळ करून संदीपला मारहाण केली. एवढ्यावर न थांबता प्रल्हाद आणि विश्वनाथ जामगे , यादोजी जामगे , आप्पाराव जामगे , काशिनाथ जामगे , ज्ञानोबा जामगे दशरथ जामगे , सुदाम जामगे यांनी संदीप दुधमलच्या घरी जाऊन त्याच्या आई-वडील,चुलता-चुलती, भाऊ-बहीण यांना घरात घुसून मारहाण केली. ही मारहाण सुरू असताना हे भांडण सोडवायला गेलेल्या गणेश एडके यांना डोक्यामध्ये कुऱ्हाडीचा घाव घालून खाली पाडण्यात आले. त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर गावात तणाव पसरला आहे. पोलिसांनी नऊ जणांवर गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.