शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

खरिपात सोयाबीनचाच बोलबाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 1:09 AM

तालुक्यातील लागवड क्षेत्र ४५ हजार ८८९ क्षेत्रापैकी तब्बल २२ हजार ४४१ हेक्टरमध्ये सोयाबीनचा पेरा झाला आहे़ खरीप हंगामात सोयाबीनच्या पिकालाच शेतकऱ्यांनी पसंती दिल्यामुळे या हंगामात सोयाबीनचाच बोलबाला दिसून आला़ तालुक्यात बहुतांश महसूल क्षेत्रांतर्गत सोयाबीनचा पेरा सरासरी ५० टक्के आहे़ गतवर्षीच्या तुलनेत १७ जुलैअखेर ५१ मि़मी़ पाऊस जास्त झाल्याने पिकांची स्थिती सध्यातरी भरभक्कम आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कबिलोली : तालुक्यातील लागवड क्षेत्र ४५ हजार ८८९ क्षेत्रापैकी तब्बल २२ हजार ४४१ हेक्टरमध्ये सोयाबीनचा पेरा झाला आहे़ खरीप हंगामात सोयाबीनच्या पिकालाच शेतकऱ्यांनी पसंती दिल्यामुळे या हंगामात सोयाबीनचाच बोलबाला दिसून आला़ तालुक्यात बहुतांश महसूल क्षेत्रांतर्गत सोयाबीनचा पेरा सरासरी ५० टक्के आहे़ गतवर्षीच्या तुलनेत १७ जुलैअखेर ५१ मि़मी़ पाऊस जास्त झाल्याने पिकांची स्थिती सध्यातरी भरभक्कम आहे़कापूस पिकाला गतवर्षी बोंडअळीने ग्रासले असल्याने शेतकºयांचे अतोनात नुकसान झाले़ राज्य शासनाने एकरी अनुदान मंजूर केले होते; पण या अनुदानामुळे कापूस लागवडीचा खर्चदेखील भागला नाही़ कापूस विक्रीला बाजारात भाव नाही तर कापूस वेचणीला शेतमजूर मिळत नाहीत, ही मुख्य अडचण आता शेतकºयांसमोर आहे़ शेतमजुरांच्या विश्वासावर शेती करणे आता सोपे नाही़ त्यामुळे अद्ययावत यंत्रसामग्रीचा वापर सुरू झाला़ ट्रॅक्टरद्वारेच शेतीची सर्व कामे केली जात असून ९० टक्के पेरण्या ट्रॅक्टरनेच करण्यात आल्याचे पुढे आले आहे़ खरीप हंगामाच्या काळात कोरडवाहू व ओलिताखाली असलेल्या शेतीमध्ये जवळपास १० वेगवेगळी पिके घेतली जातात़ तर पशुपालक शेतकरी दुग्धव्यवसायासाठी चारा या पिकांची लागवड करतात़ यावर्षी जवळपास दीडशे हेक्टरमध्ये तालुक्यात चारा लागवड केलेली आहे़सन २०१७-१८ च्या तुलनेत तालुक्यात तीन हजार हेक्टरमध्ये कापसाचा पेरा घटला आहे़ बोंडअळीचा परिणाम झाल्याने कापसाचा पेरा कमी झाल्याचे चित्र आहे़ तूर पिकाचा पेरादेखील पाचशे हेक्टरमध्ये घटला आहे़ गतवर्षी दोन्ही पिकांना आर्थिक फटका बसला होता़ तुरीचे विक्रमी उत्पादन झाल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी शासनाकडून खरेदी झाली़मूग-उडदाचीही दीड हजार हेक्टरमध्ये घट झाली आहे़ यावर्षीच्या खरीप हंगामातील पेरणीचा संयुक्त कृषी-महसूल-पंचायतने अहवाल तयार केला असून सोयाबीन पिकांचा पेरा धमाकेदार आहे़ गतवर्षीदेखील सोयाबीनचा उतारा वाढला होता़ पेरणी, काढणी आदी कामे तेलंगणा, पंजाब राज्यातील यंत्रसामग्रीद्वारे केली जात होती़ त्यामुळे शेतमजुरांच्या तुटवड्यामुळे शेतकºयांनी भाड्याने एकरी दराप्रमाणे पेरणी केल्याचे चित्र पुढे आले आहे़सोयाबीनची खरेदीदेखील गावपातळीवर करण्यात आल्याने सोयीचे झाले होते़---तालुक्यात पाच महसूल मंडळातंर्गत ५७ हजार ८२१ भौगोलिक क्षेत्र आहे़ सन २०१८ खरीप हंगामअंतर्गत ४५ हजार ८८९ हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे़ ५८ हजार क्षेत्र असले तरी ४८ हजार क्षेत्र लागवडलायक आहे़ यापूर्वी कापूस या पिकाला शेतकºयांची पहिली पसंती राहत होती; पण गतवर्षीपासून सोयाबीन पिकांनाच महत्त्व दिले जात आहे़---तालुक्यात पाच महसूल मंडळांतर्गत बिलोली परिसरातील ५ हजार ३०० हेक्टरमध्ये सर्वाधिक सोयाबीनचा पेरा आहे़ त्याखालोखाल सगरोळी ४ हजार ८००, कुंडलवाडी ४ हजार ४०० हेक्टर, लोहगाव क्षेत्रात ४ हजार ६००, आदमपूर साडेतीन हजार हेक्टरमध्ये पेरा झाला़ यावर्षी तालुक्यात केवळ साडेआठ हजार हेक्टरमध्ये कापसाची लागवड झाली़मूग, उडीद ही दोन पिकेदेखील साडेआठ हजार हेक्टरमध्येच आहेत़ गतवर्षीची तूर वेळेवर विक्री झाली नाही़ अजूनही शासनाकडून नाफेडवर झालेली खरेदीची देयके मिळाली नाहीत़ त्यामुळे या हंगामात तूर केवळ ५ हजार ३२३ हेक्टर क्षेत्रात आहे़ खरीप ज्वारीपेक्षा भात (साळी) लागवड जास्त असून भात पीक ४२५ हेक्टर तर ज्वारी केवळ १२५ हेक्टरवर पेरा झाला़

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरी