प्ररकरण मिटविण्यासाठी हवालदाराने घेतली लाच, एसीबीने केली कारवाई
By प्रसाद आर्वीकर | Updated: September 22, 2022 15:16 IST2022-09-22T15:16:07+5:302022-09-22T15:16:59+5:30
बिलोली तालुक्यातील कोंडलवाडी येथे हा प्रकार उघडकीस आला.

प्ररकरण मिटविण्यासाठी हवालदाराने घेतली लाच, एसीबीने केली कारवाई
नांदेड : पोलीस ठाण्यात दाखल झालेले प्रकरण मिटवून घेण्यासाठी पोलीस हवालदाराने २ हजार रुपयांची लाच घेऊन पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. बिलोली तालुक्यातील कोंडलवाडी येथे हा प्रकार उघडकीस आला असून, हवालदाराविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोंडलवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार तैनात बेग मनसब बेग हे कोंडलवाडी पोलीस ठाण्यात दाखल झालेले एक प्रकरण मिटवून घेण्यासाठी ४ हजार रुपयांची मागणी करीत असल्याची तक्रात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल झाली होती. या प्रकरणात एसीबीने २० सप्टेंबर रोजी तक्रारीची पडताळणी केली. त्याच दिवशी हवालदार तैनात बेग मनसब बेग याने ताडजोडीअंती २ हजार रुपयांची लाच तक्रारदारकडून स्वीकारून मोटरसायकलवरून पळून गेला, असे एसीबीने तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी आरोपी हवालदार बेग याच्या विरुद्ध कोंडलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई एसीबीचे पोलीस निरीक्षक अरविंद हिंगोले, सहायक पोलीस उपनिरीक्षक संतोष शेट्टे, गजेंद्र मांजरमकर, कर्मचारी एकनाथ गंगातिर्थ, संतोष वच्चेवार, सोनटक्के यांच्या पथकाने केली. पोलीस निरीक्षक हिंगोले तपास करीत आहेत.