शहरं
Join us  
Trending Stories
1
Virat Kohli Record : किंग कोहलीचा 'फिफ्टी प्लस'चा पंच; संगकाराचा महारेकॉर्डही मोडला आता फक्त...
2
'अकबराच्या बापाचा बाप...', नाशिक कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य
3
BMC Elections 2026 : 'ठाकरे ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे, विचार संपत नसतो'; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
4
जम्मूत मोठी घडामोड! दहशतवाद्यांनी लपवलेला सॅटेलाईट डिव्हाइस सापडला, सीमापार सुरु होता संपर्क
5
'खूप उशीर होण्यापूर्वी...' व्हेनेझुएलावरील कारवाईनंतर ट्रम्प यांची आता 'या' देशाला थेट धमकी
6
IND vs NZ यांच्यातील सामन्यादरम्यान 'रो-को'चा खास सन्मान! चक्क कपाटातून बाहेर आली विराट-रोहित जोडी (VIDEO)
7
इराणने अमेरिका-इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी दिली, सरकारविरोधी निदर्शने तीव्र, २०३ जणांचा मृत्यू
8
‘हैदराबादचा दाढीवाला आणि ठाण्याचा दाढीवाला एकाच नाण्याचा दोन बाजू’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
9
मुख्यमंत्र्यांच्या रॅली दरम्यान भोसरीत इमारतीवर आग; स्वागतासाठी लावलेल्या फटाक्यांमुळे लागली आग
10
Nashik Municipal Corporation Election 2026 : "दोन्ही भावांमध्ये राम उरला नाही, जो राम का नहीं वो किसी काम के नहीं"; देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर साधला निशाणा
11
BMC Election 2026 : जय जवान पथकातील गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दिली होती सलामी
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहितनं रचला नवा इतिहास; असा पराक्रम करणारा क्रिकेट जगतातील तो पहिलाच
13
स्वत: दोन बायका केल्या, पण आपलं लग्न लावून देत नाहीत, संतापलेल्या मुलाने वडिलांची केली हत्या
14
"मला अजित पवारांवर कालही विश्वास होता आणि आजही आहे" सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
15
अमेरिकेने हाय टॅरिफ लादला; भारताने 'या' देशांकडे वळवला मोर्चा, निर्यातीत मोठी वाढ, पाहा आकडेवारी
16
भारत-बांगलादेश वादात पाकिस्तानची 'लुडबुड'; स्वतःच्या देशात सुरक्षेचा पत्ता नाही आणि म्हणतंय...
17
भारतावर विश्वास ठेवा, इतरांच्या दाव्यांकडे दुर्लक्ष करा; भारत-अमेरिका करारावर गोयल यांची स्पष्टोक्ती
18
"मी यांना चॅलेंज देतो की, या ठाकरे बंधूंनी..."; भाजपच्या गिरीश महाजन यांचा आक्रमक पवित्रा
19
IND vs NZ 1st ODI : न्यूझीलंडकडून सलामी जोडीनंतर डॅरिल मिचेलची बॅट तळपली! टीम इंडियासमोर ३०१ धावांचं आव्हान
20
₹३६३४१२००००००० स्वाहा...! देशातील 7 कंपन्यांना मोठा फटका, रिलायन्सचं सर्वाधिक नुकसान 
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसकडून संविधान बदलण्याचा अपप्रचार, त्यांना धडा शिकविण्याची वेळ आलीय: अशोकराव चव्हाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 17:09 IST

काँग्रेस संपण्याची गणती आता सुरू झाली आहे. काँग्रेसमध्ये आता कोणताही नेता उरलेला नाही.

नांदेड : भारतीय जनता पक्ष हा संविधानाला मानणारा पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसदेत प्रथम प्रवेश करताना संविधानासमोर नतमस्तक झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेला मान देऊनच भाजप सरकार काम करत आहे. मात्र, काँग्रेसकडून सातत्याने संविधान बदलण्याचा अपप्रचार केला जातोय. त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली, असे प्रतिपादन खासदार अशोक चव्हाण यांनी केले.

ते चौफाळा भागात आयोजित प्रचार सभेत बोलत होते. खा. चव्हाण म्हणाले, विरोधकांकडे कोणताही अजेंडा नसल्याने ऊठसूट माझ्यावर टीका करतात. काँग्रेस संपण्याची गणती आता सुरू झाली आहे. काँग्रेसमध्ये आता कोणताही नेता उरलेला नाही. भारतीय जनता पक्षाकडे विकासाचा अजेंडा असून भाजपच नांदेड शहराचा सर्वांगीण विकास करेल. बारा बलुतेदार हे गेल्या अनेक पिढ्यांपासून आपले पारंपरिक व्यवसाय चांगल्या प्रकारे चालवत असून त्यांचे बचत गट निर्माण होत आहेत. येणाऱ्या काळात लखपती दीदी बनविण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून भाजप सरकार अधिकची रक्कम देणार आहे. जुन्या नांदेडातील विकासकामांना गती मिळणार असून चौफाळा भागातील प्रलंबित प्रश्न तत्काळ मार्गी लावले जाणार आहेत. मतदारांनी भाजपच्या सर्व उमेदवारांना मतदानरूपी आशीर्वाद देऊन साथ दिल्यास निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची निश्चित पूर्तता केली जाईल, असे आश्वासनही खासदार अशोकराव चव्हाण यांनी दिले. यावेळी चैतन्यबापू देशमुख, बाळू खोमणे, बाळासाहेब कांबळे, अंचन जोंधळे, शांताबाई कोमटवार, नागेश कोकुलवार, भालचंद्र पत्की आदींची उपस्थिती होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Congress falsely accuses BJP of changing constitution: Ashok Chavan.

Web Summary : Ashok Chavan accuses Congress of falsely claiming BJP will change the constitution. He claims BJP respects it and will develop Nanded. He promised development, especially for women’s groups and old Nanded.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Nanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाAshok Chavanअशोक चव्हाण