शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

काँग्रेस-राष्ट्रवादीची आज संयुक्त सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 12:44 AM

शहरातील इंदिरा गांधी मैदानावर सायंकाळी ५ वाजता संयुक्त सभा आयोजित करण्यात आली आहे़

नांदेड : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांच्या प्रचाराचा प्रारंभ बुधवारी नांदेड येथून होत आहे़ यानिमित्ताने काँग्रेस प्रभारी मल्लीकार्जुन खरगे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा़अशोकराव चव्हाण यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत शहरातील इंदिरा गांधी मैदानावर सायंकाळी ५ वाजता संयुक्त सभा आयोजित करण्यात आली आहे़ या सभेला मोठी उपस्थिती लावण्याचे आवाहन अशोकराव चव्हाण यांनी केले आहे़या संयुक्त सभेला माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, गुजरात काँग्रेसचे प्रभारी खा़राजीव सातव, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष आ़ जोगेंद्र कवाडे, माजी मंत्री आ़ अब्दुल्ल सत्तार, माजी मंत्री कमलकिशोर कदम, माजी मंत्री गंगाधरराव कुंटूरकर, जयप्रकाश दांडेगावकर, आ़ डी़ पी़ सावंत यांची उपस्थिती राहणार आहे़ शहरातील १२ एकरच्या इंदिरा गांधी मैदानावर सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे़ सभेला जवळपास ३० हजारांचा जनसमुदाय उपस्थित राहील, असा विश्वास महानगराध्यक्ष आ़ अमरनाथ राजूरकर यांनी व्यक्त केला आहे़पद्मश्री कदम यांच्या पुतळ्याचे होणार अनावरणनांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री श्यामराव कदम यांचा जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालय प्रांगणात अर्धाकृती पुतळा उभारण्यात आला आहे़ या पुतळ्याचेही २० फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता खा़ शरदचंद्र पवार यांच्या हस्ते अनावरण होणार आहे़ अध्यक्षस्थानी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा़ अशोकराव चव्हाण राहणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष दिनकर दहीफळे, उपाध्यक्ष डॉ़सुनील कदम यांनी दिली़

टॅग्स :NandedनांदेडPoliticsराजकारणElectionनिवडणूकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Sharad Pawarशरद पवारAshok Chavanअशोक चव्हाण