शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

हे माझे पहिले बाळंतपण नाही, सरकार येते अन्‌ जाते; अशोक चव्हाणांची मिश्कील टिप्पणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 11:49 IST

सध्याचे सरकार म्हणजे विकासकामांना स्थगिती देणारे सरकार आहे, अशोक चव्हाणांची टीका.

मालेगाव (जि. नांदेड) : जे काम मंजूर झाले त्याला स्थगिती, ज्याची वर्कऑर्डर झाली नाही त्याला स्थगिती अशाप्रकारे स्थगिती देण्याचा सपाटा सुरू आहे. सरकार येते अन् जाते. मीही मंत्री, मुख्यमंत्री होतो. नंतर राजीनामा दिला. त्यामुळे माझे हे काही पहिले बाळंतपण नाही, अशी मिश्कील टिप्पणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली. सरकार कुणाचेही असो, परंतु जनतेची कामे थांबली नाही पाहिजेत, असेही ते म्हणाले. 

अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथील जल जीवन मिशनअंतर्गत सोमवारी पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. चव्हाण म्हणाले की, सध्याचे सरकार म्हणजे विकासकामांना स्थगिती देणारे सरकार आहे. महाविकास आघाडी सरकार असताना निधी वाटप आणि विकासकामात आम्ही कधीही भेदभाव केलेला नाही, असे त्यांनी सांगितले.

पक्ष सोडण्याच्या चर्चा निरर्थक   अशोक चव्हाण हे काँग्रेस पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. या चर्चांना अशोक चव्हाण यांनी पूर्णविराम दिला आहे. मी असा कुठलाही निर्णय घेतला नाही, कोण करत आहे चर्चा, चर्चांना महत्त्व नाही, अशी प्रतिक्रिया देत चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याच्या चर्चा उडवून लावल्या.  

अशोक चव्हाण हे बहुमत चाचणीच्या वेळी सभागृहात उशिरा पोहोचले होते. त्यामुळे ते मतदान करू शकले नव्हते. त्यांच्यासोबत इतर ४ ते ५ आमदार बहुमत चाचणीपासून दूर राहिले होते. त्यामुळे काँग्रेसने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तेव्हापासून ते नाराज असल्याच्या चर्चा होत्या.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्र