शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यावर पुनश्च वर्चस्व मिळविण्याचे काँग्रेसपुढे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 05:12 IST

लोकसभा निवडणुकीतील अनपेक्षित पराभवानंतर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे जिल्ह्यावर पुनश्च वर्चस्व मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत

- विशाल सोनटक्केनांदेड : लोकसभा निवडणुकीतील अनपेक्षित पराभवानंतर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे जिल्ह्यावर पुनश्च वर्चस्व मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत तर भाजप-शिवसेनेनेही युतीची पकड मजबूत करण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.लोकसभा निवडणुकीत नांदेडमध्ये काँग्रेसचा धक्कादायक पराभव झाला. या निवडणुकीत अशोक चव्हाण यांचा भाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांनी ४० हजार मतांनी पराभव केला़ लोकसभा मतदारसंघातील सहापैकी भोकर, नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तर या विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य मिळाले तर काँग्रेसचे आमदार वसंतराव चव्हाण यांच्या नायगाव विधानसभा मतदारसंघासह देगलूर आणि मुखेड मतदारसंघात भाजपाने आपले वर्चस्व दाखवून दिले. त्यामुळेच लोकसभेप्रमाणेच आगामी विधानसभा निवडणुकातही नांदेड जिल्ह्यातील सर्व नऊही मतदारसंघात कमालीची चुरस पहायला मिळणार आहे.महानगरपालिका, जिल्हा परिषदेसह बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांवर अद्यापही काँग्रेसची मजबूत पकड आहे. तर दुसरीकडे लोकसभेतील विजयामुळे भाजपा पदाधिकाऱ्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. काँग्रेसकडून अशोक चव्हाण, डी. पी. सावंत, वसंतराव चव्हाण रिंगणात उतरणार हे जवळपास निश्चित आहे तर भाजपाकडून डॉ.तुषार राठोड, दिलीप कंदकुर्ते, राजेश पवार आदी कामाला लागले आहेत. देगलूर मतदारसंघातून शिवसेनेतर्फे सुभाष साबणे आणि हदगावमधून नागेश पाटील आष्टीकर यांची उमेदवारीही निश्चित आहे. उर्वरीत मतदारसंघात सर्वच पक्षात उमेदवारीसाठी मोठी चुरस आहे.हदगाव मतदारसंघातून काँग्रेसकडून माधवराव पाटील आणि गंगाधर पाटील चाभरेकर यांनी फिल्डींग लावलेली आहे. देगलूर मतदारसंघात रावसाहेब अंतापूरकर यांचे नाव पुढे असले तरी येथे ऐनवेळी नवा चेहरा काँग्रेस मैदानात उतरवू शकते. मुखेड मतदारसंघातही सलग दोनवेळा काँग्रेस पराभूत झालेली आहे. नांदेड दक्षिण मतदारसंघासाठी काँग्रेसकडून नव्या चेहºयाचा शोध सुरू आहे. भाजपाकडे यंदा इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी आहे. उत्तर विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांचे नाव पुढे येत आहे़ येथून बालाजीराव शिंदे हेही आग्रही आहेत़ तर किनवटसाठी संध्या राठोड आणि अशोक पाटील सूर्यवंशी प्रयत्नशील आहेत. देगलूर मतदारसंघातून शिवाजीराव वाडेकर यांच्या नावाची चर्चा आहे़लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे आ़ प्रताप पाटील चिखलीकर हे लोकसभेवर निवडून गेले आहेत़ चिखलीकर यांची या विधानसभा मतदारसंघावर मजबूत पकड आहे़ त्यामुळे येथून कोणाला लॉटरी लागते़ याबाबत उत्सुकता आहे़ चिखलीकरांचे मेहुणे श्यामसुंदर शिंदे, त्यांचा मुलगा प्रवीण पाटील चिखलीकर आणि मुलगी जि़ प़ सदस्या प्रणिता देवरे चिखलीकर यांची नावे चर्चेत आहेत़ युती झाल्यास मात्र भाजपासाठी ही जागा शिवसेनेकडून सोडविण्यासाठी चिखलीकरांना ताकद लावावी लागणार आहे़ नांदेड दक्षिण मतदारसंघाचे आमदार हेमंत पाटील हे हिंगोली लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे येथून त्यांच्या पत्नी राजश्री पाटील या इच्छुक आहेत़नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे मतदान सुमारे ९ टक्क्यांनी घसरले आहे. तर भाजपाच्या मतात ३ टक्क्यांची वाढ झाली आहे. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने लोकसभेत लक्षवेधी मते खेचत निवडणुकीचे गणित बदलले. या आघाडीने पाच विधानसभा मतदारसंघातून प्रत्येकी २५ हजारांहून अधिक अशी १४ टक्के मते मिळविली़ त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडीची भूमिका काय राहते हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.>सर्वात मोठा विजयभोकर : अमिता चव्हाण(काँग्रेस) ४७,५५७ (पराभव : डॉ. माधवराव किन्हाळकर, भाजप)>सर्वात कमीमताधिक्याने पराभवनांदेड दक्षिण : दिलीप कंदकुर्ते - (भाजप) ३२०७ (विजयी : हेमंत पाटील- शिवसेना)

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाण