शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
3
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
4
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
5
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
6
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
7
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
8
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
9
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
10
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
11
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
12
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
13
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
14
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
15
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
16
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
17
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
18
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
19
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
20
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड महापालिकेत भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस-वंचित एकत्र; जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 16:24 IST

या निर्णयामुळे नांदेडमध्ये आता भाजप विरुद्ध काँग्रेस-वंचित अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे.

नांदेड: महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नांदेडच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली आहे. भाजपला रोखण्यासाठी आणि धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी टाळण्यासाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या आघाडीनुसार काँग्रेस ६१ जागा तर वंचित बहुजन आघाडी २० जागा लढवणार असल्याची घोषणा काँग्रेसचे पक्ष निरीक्षक माणिकराव ठाकरे यांनी केली.

भाजप विरुद्ध काँग्रेस-वंचित अशी थेट लढत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यभरात काँग्रेससोबत जाण्याचे संकेत दिले होते, त्याचे पडसाद आज नांदेडमध्ये उमटले. रविवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या खलबत्त्यांनंतर हा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला. यावेळी माणिकराव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील इतर पक्षांकडून कोणताही प्रस्ताव न आल्याने काँग्रेसने वंचितसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. या निर्णयामुळे नांदेडमध्ये आता भाजप विरुद्ध काँग्रेस-वंचित अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वबळामागे भाजपपत्रकार परिषदेत बोलताना माणिकराव ठाकरे यांनी भाजप खासदार अशोकराव चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली. "भाजपकडून 'तोडा, फोडा आणि निवडणुका जिंका' हे धोरण राबवले जात आहे. काँग्रेसच्या मतांचे विभाजन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) खांद्यावर बंदूक ठेवून भाजपच डाव खेळत आहे," असा आरोप त्यांनी केला. यावेळी खासदार रवींद्र चव्हाण, काँग्रेस शहराध्यक्ष अब्दुल सत्तार आणि वंचितचे शहराध्यक्ष प्रशांत इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती. या नव्या समीकरणामुळे अशोक चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Congress-Vanchit Alliance Aims to Block BJP in Nanded Municipal Elections.

Web Summary : In Nanded, Congress and Vanchit Bahujan Aghadi unite to counter BJP in municipal polls. Congress will contest 61 seats, Vanchit 20. Congress accuses BJP of using NCP to divide votes. BJP's reputation is at stake.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Nanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिका