दिलासादायक ! औरंगाबाद- हैदराबाद उत्सव विशेष गाडीला मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 04:51 PM2020-11-27T16:51:12+5:302020-11-27T16:53:07+5:30

या दोन्ही गाड्यांना प्रवाशांचा प्रतिसाद समाधानकारक आहे.

Comfortable! Aurangabad-Hyderabad festival special train extended | दिलासादायक ! औरंगाबाद- हैदराबाद उत्सव विशेष गाडीला मुदतवाढ

दिलासादायक ! औरंगाबाद- हैदराबाद उत्सव विशेष गाडीला मुदतवाढ

googlenewsNext
ठळक मुद्देया दोन्ही गाड्यांमध्ये अनारक्षित प्रवाशांना  प्रवेश मिळणार नाही. या विशेष  गाड्यांच्या वेळेत बदल केला आहे.

नांदेड : प्रवाशांच्या सुविधेकरिता दक्षिण मध्य रेल्वेऔरंगाबाद –हैदराबाद – औरंगाबाद आणि अमरावती-तिरुपती-अमरावती या उत्सव विशेष गाड्या चालवीत आहे. या दोन्ही गाड्यांना प्रवाशांचा प्रतिसाद समाधानकारक आहे. यामुळे या दोन्ही गाड्यांना एका महिन्याची वाढ दिली आहे. 

गाडीक्रमांक ०७०५० – औरंगाबाद ते हैदराबाद उत्सव विशेष गाडीला १ ते ३१ डिसेंबरपर्यंत वाढ देण्यात आली आहे. ही गाडी औरंगाबाद रेल्वे स्थानकावरून दुपारी -४.१५ वाजता सुटेल आणि जालना - ५.०२, परभणी - ७.३०, परळी-१०.०५  मार्गे हैदराबाद येथे दुसऱ्या दिवशी सकाळी – ६.३० वाजता पोहोचेल. 

गाडीक्रमांक ०७०४९ – हैदराबाद ते औरंगाबाद उत्सव विशेष गाडी : या विशेष गाडीला ३० नोव्हेंबर ते ३० डिसेंबरपर्यंत वाढ देण्यात आली आहे.      ही गाडी ३० नोव्हेंबरपासून बदललेल्या वेळेनुसार धावेल. हैदराबाद रेल्वे स्थानकावरून रात्री १०.४५ वाजता सुटेल. परळी- ०७.१०, परभणी-९.३०, जालना-११.५२ मार्गे औरंगाबादला दुपारी १.२० वाजता पोहोचेल. गाडीसंख्या ०२७६५- तिरुपती-अमरावती द्वी साप्ताहिक उत्सव विशेष गाडी तिरुपती येथून दर मंगळवारी आणि शनिवारी सुटेल. या गाडीला १ डिसेंबर ते २९ डिसेंबरपर्यंत वाढ देण्यात आली आहे. ही गाडी १ डिसेंबरपासून तिच्या बदलेल्या वेळेप्रमाणे धावेल. ही गाडी १ डिसेंबरपासून तिरुपती येथून दुपारी ४.४० वाजता सुटेल आणि काचीगुडा-४.१५, निझामाबाद-६.४०, नांदेड -८.५१, पूर्णा-०९.४०, अकोला- १.४५ मार्गे अमरावती येथे दुपारी ३.१० वाजता पोहोचेल. 

गाडीक्रमांक ०२७६६- अमरावती ते तिरुपती द्वीसाप्ताहिक उत्सव विशेष गाडी अमरावती येथून दर सोमवारी आणि गुरुवारी  सुटेल. या गाडीला ३ ते ३१ डिसेंबरपर्यंत वाढ देण्यात आली आहे. ही गाडी ३ डिसेंबरपासून अमरावती येथून बदललेल्या वेळेनुसार सकाळी ६.४५ वाजता सुटेल, अकोला- ८.२०, पूर्णा-११.५०, नांदेड -१२.२५, निझामाबाद-२.३५, काचीगुडा-५.५०, मार्गे तिरुपती येथे दुसऱ्या दिवशी  सकाळी ६.२५ वाजता पोहोचेल.  

कोरोना नियमावलीचे पालन आवश्यक
प्रवाशांनी रेल्वेस्थानकावर तसेच या गाडीत प्रवास करताना भारत सरकार आणि राज्य  सरकार यांनी कोविड -१९ संसर्गासंदर्भात वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक असेल. या दोन्ही गाड्यांमध्ये  अनारक्षित प्रवाशांना  प्रवेश मिळणार नाही. या गाड्या पूर्णपणे आरक्षित आहेत. या विशेष  गाड्यांच्या वेळेत बदल केला आहे.

Web Title: Comfortable! Aurangabad-Hyderabad festival special train extended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.