शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Live : बीडमध्ये पंकजा मुंडे आघाडीवर, अमरावतीमध्ये नवनीत राणा पिछाडीवर
2
Loksabha Election Result: इंडिया आघाडीचा प्रयोग यशस्वी; काँग्रेसच्या जागांमध्ये 'खटाखट' वाढ
3
Varanasi, Amethi Lok Sabha Result 2024 : वाराणसीत मोदींनी बाजी पालटली! 9000 मतांनी घेतली आघाडी; स्मृती इराणी पिछाडीवर
4
Lok Sabha Election Result 2024 NDA vs INDIA Live: मोदी, राहुल आघाडीवर!
5
Ratnagiri-Sindhudurga Lok sabha Election Result: विनायक राऊतांनी नारायण राणेंचे लीड तोडले; 30 मतांनी आघाडीवर
6
Lok Sabha Result 2024: मथुरेतून हेमा मालिनी आघाडीवर; 'मंडी'तून कंगना बाजी मारणार का? जाणून घ्या सेलिब्रिटींचे अपडेट्स
7
Rai Bareli Lok Sabha Result 2024: राहुल गांधी दोनही मतदारसंघातून पुढे, बाजी मारणारच!
8
Lok Sabha Result 2024: मुंबईत महायुती ४ तर मविआ २ जागांवर आघाडीवर; कोणत्या मतदार संघात कोण पुढे?
9
Stock Market : शेअर बाजाराला कल नापसंत! Adani समूहाच्या शेअर्समध्ये भूकंप; 'हे' शेअर्स सर्वाधिक पडले
10
Raver Lok Sabha Result 2024: रक्षा खडसे २७ हजार मतांनी आघाडीवर, श्रीराम पाटील पिछाडीवर
11
Kolhapur Lok Sabha Election Result 2024 : कोल्हापुरात शाहू महाराज ८ हजार मतांनी आघाडीवर; संजय मंडलिक पिछाडीवर
12
ठाण्यामधून समोर आला धक्कादायक कल, ठाकरे गटाला धक्का शिंदे गटाच्या म्हस्के यांनी घेतली आघाडी  
13
Loksabha Election 2024 Sensex : निकालांदरम्यान शेअर बाजार जोरदार आपटला; सेन्सेक्स २००० अंकांनी, निफ्टी ७६६ अंकांनी घसरला
14
मतमोजणीच्या पहिल्या तासाभरात महाराष्ट्रात कडवी टक्कर; महायुती आणि मविआ एवढ्या जागांवर आघाडीवर
15
Lok Sabha Election 2024 Result : गांधीनगरमधून अमित शाह ९० हजार मतांनी पुढे, तर राजकोटमधून पुरुषोत्तम रुपालांची आघाडी
16
Hyderabad Lok Sabha Result 2024: सुरुवातीच्या निकालात ओवेसी आघाडीवर, माधवी लता करणारका 'कमबॅक'?
17
नणंद श्वेता बच्चनला ऐश्वर्या रायच्या या सवयीची येते चीड, खुद्द तिनेच शोमध्ये केला खुलासा
18
Lok Sabha Result 2024: निकालात NDA पुढे, INDIA आघाडी पिछाडीवर; PM मोदी, राहुल गांधी आघाडीवर
19
मुंबईचा बॉस कोण? मतमोजणीला सुरुवात! भाजप, शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेनेच्या लढाईत वर्चस्व कोणाचे?
20
"EVM हॅक करणाऱ्याला निवडणूक आयोगाने...."; निकालाआधी काँग्रेसच्या उमेदवाराचे मोठे विधान

नांदेडच्या जयभीमनगरात कोम्बिंग आॅपरेशन !; पोलिसांनी वृद्ध, महिला, मुलांनाही बेदम झोडपले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2018 11:31 AM

शहरातील जनता कॉलनी भागात पोलिसांच्या जीपवर दगडफेक केल्यानंतर पोलिसांनी जयभीमनगर, आंबेडकरनगर, जनता कॉलनी  आदी भागात मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबविताना महिला, मुले व वृद्धांना बेदम मारहाण केली. यामुळे संतप्त नागरिकांनी महात्मा फुले चौकात काही वेळ रास्ता रोकोही केला. 

ठळक मुद्देबुधवारी दुपारी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे प्रमुख साहेबराव नरवाडे हे गस्तीवर असताना त्यांच्या वाहनावर गणेशनगर भागात अचानकपणे दगडफेक केली. यामध्ये तीन पोलीस कर्मचारी जखमी  झाले. ही बाब समजताच खुद्द पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना हे मोठ्या फौजफाट्यासह जयभीमनगरात पोहोचले. राज्य राखीव दल, दंगा नियंत्रण पथक यांच्यासह  पोलीस अधिकारी-कर्मचा-यांनी जयभीमनगर, आंबेडकरनगर या भागात शोध मोहीम राबविली.

नांदेड : शहरातील जनता कॉलनी भागात पोलिसांच्या जीपवर दगडफेक केल्यानंतर पोलिसांनी जयभीमनगर, आंबेडकरनगर, जनता कॉलनी  आदी भागात मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबविताना महिला, मुले व वृद्धांना बेदम मारहाण केली. यामुळे संतप्त नागरिकांनी महात्मा फुले चौकात काही वेळ रास्ता रोकोही केला. 

बुधवारी दुपारी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे प्रमुख साहेबराव नरवाडे हे गस्तीवर असताना त्यांच्या वाहनावर गणेशनगर भागात अचानकपणे दगडफेक केली. यामध्ये तीन पोलीस कर्मचारी जखमी  झाले. ही बाब समजताच खुद्द पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना हे मोठ्या फौजफाट्यासह जयभीमनगरात पोहोचले. राज्य राखीव दल, दंगा नियंत्रण पथक यांच्यासह  पोलीस अधिकारी-कर्मचा-यांनी जयभीमनगर, आंबेडकरनगर या भागात शोध मोहीम राबविली. यावेळी दहा ते पंधरा तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 

जलदकृती दलाच्या जवानांनी अक्षरश: दारे लावून बसलेल्या नागरिकांच्या घरात दार तोडून प्रवेश केला. यावेळी पोलिसांच्या मारहाणीत लक्ष्मी सिद्धार्थ जावळे ही महिला जखमी झाली. जयभीमनगरातील पृथ्वीराज रमेश काळे या विद्यार्थ्याला दार तोडून पोलिसांनी मारहाण केली. जयभीमनगरातील संगीता संजय खंडागळे या युवतीच्या घरातही पोलीस शिरले. पोलिसांची दहशत पाहून ही युवती अक्षरश: बेशुद्ध झाली. तिला खाजगी रुग्णालयात दाखल करावे लागले. राष्ट्रपाल रायबोले या युवकालाही घरात शिरुन बेदम मारहाण केली. हा प्रकार समजताच बहुजन विकास आघाडीचे सुरेश गायकवाड, एन. डी. गवळे, भदंत पंय्याबोधी, रमेश सोनाळे, सुखदेव चिखलीकर आदींनी जिल्हाधिका-यांची भेट घेऊन पोलिसांची दडपशाही तत्काळ रोखण्याची मागणी केली. त्यानंतर आंबेडकरी संघटनांनी महात्मा फुले चौक आयटीआय येथे रास्ता रोको आंदोलनही केले.

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंदNandedनांदेड