शहरं
Join us  
Trending Stories
1
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
2
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
3
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
4
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
5
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
6
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
7
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
8
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
9
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
10
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
11
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
12
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
13
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
14
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
15
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
16
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
17
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
18
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
19
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
20
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!

माहूर शहर व तालुक्यात कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 11:43 IST

माहूर शहर व तालुक्यातील सर्वधर्मीय,सामाजिक संघटनांनी शेकडो पुराव्यासह १२ मार्च पासून नामफलक उभारण्याच्या मागणीच्या अनुषंगाने पाठपुरावा सुरु केला असला तरी नगरपंचायत प्रशासनाने या आंदोलनाची अद्याप दखल घेतली नाही़ त्यामुळे गुरूवारी माहूर कडकडीत बंद करण्यात आला़

लोकमत न्यूज नेटवर्कश्रीक्षेत्र माहूर : माहूर शहर व तालुक्यातील सर्वधर्मीय,सामाजिक संघटनांनी शेकडो पुराव्यासह १२ मार्च पासून नामफलक उभारण्याच्या मागणीच्या अनुषंगाने पाठपुरावा सुरु केला असला तरी नगरपंचायत प्रशासनाने या आंदोलनाची अद्याप दखल घेतली नाही़ त्यामुळे गुरूवारी माहूर कडकडीत बंद करण्यात आला़श्रीक्षेत्र माहूर हे जगातील आदरणीय श्रद्धास्थान आहे. एकीकडे राज्य शासन छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रात जगातील सर्वाधिक उंचीचे स्मारक उभारत आहे. याउलट माहूर या तीर्थक्षेत्रावर मात्र शेकडो पुरावे असलेल्या छत्रपती शिवाजी चौकात स्मारक तर सोडाच केवळ नामफलक उभारण्यासाठी विरोध होऊन या तीर्थक्षेत्रावर अकारण तणाव निर्माण झाला आहे. या प्रकरणी ३०० शिवभक्त नगरपंचायतसमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. उपोषणाच्या प्रारंभीच झालेल्या चर्चेत न.प.चे उपाध्यक्ष राजकुमार भोपी व मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी हा प्रश्न गावात स्फोटक होत असतांना देखील नगराध्यक्ष फिरोज दोसानी हे मुंबईला गेले असून ते आल्यानंतरच काय तो निर्णय होईल असे उत्तर दिल्याने शिवभक्तात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. आज शहरात नागरिक व व्यापाऱ्यांनी उत्स्फुर्त कडकडीत बंद पाळून पाठिंबा दिला़ जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी माहूर शहरात भेट देऊन अधिवेशन काळात विनाकारण खदखदणारा हा प्रश्न सोडवावा अशी मागणी जोर धरत आहे.दरम्यान, योगी प.पु.श्याम भारती महाराज यांनी उपोषण मंडपात भेट देऊन भाजपा विधानसभा प्रमुख डॉ.अशोक पाटील सूर्यवंशी, संयोजक निरधारी जाधव, उपोषणकर्ते विकास कपाटे, विनोद पाटील सुर्यवंशी, अंकुर बाळस्कर, विजय आमले, देवकुमार पाटील. यशभाऊ खराटे यांची भेट घेऊन ३०० उपोषणार्थींना पाठबळ दिले आहे.सदरील जागेचा वाद असा की, माहूर शहरातील शिवाजी चौका बाबतच्या नोंदी महसूल, न.प., पोलीस, धमार्दाय आयुक्त, विविध न्यायालयातील वाद प्रवादात हिंदू, मुस्लीम व वरील कार्यालयाची लेखी कबुली असतांना देखील विनाकारण राजकारण केले जात आहे. या प्रश्न निर्मितीनंतर माहूर न.प. ने एक ठराव घेऊन पाच नगरसेवकांची समिती गठीत केली होती़ यामध्ये दोन मराठा एक बौद्ध व दोन मुस्लीम नगरसेवकांचा समावेश होता. या पाचही जणांना कुठलीही सामाजिक जाणीव नसल्याने त्यांनी छत्रपतीच्या नाम फलकांसाठी चौकात जागा न देता दुसºयाच ठिकाणी शिफारस केल्याने लाखो शिवभक्त संतप्त झाल़े़ नगराध्यक्ष फिरोज दोसानी म्हणतात २८/०२/२०१८ च्या मासिक बैठकीत एक अनुपस्थित वगळता १८ ही नगरसेवकाच्या स्वाक्षºया आहेत़ असा खुलासा करून जिल्हाधिकारी नांदेड यांची दिशाभूल केली आहे. त्यामुळे आता या नगरसेवकावर अथवा नगर पंचायतवर कुणाचाही विश्वास राहिला नाही़ पालकमंत्री रामदास कदम यांनी कणखर भूमिका घेऊन हा प्रश्न सोडविण्याची मागणी अशी हजारो शिवभक्तातून होत आहे़दुसºया ठिकाणी शिफारसमाहूर न.प. ने एक ठराव घेऊन पाच नगरसेवकांची समिती गठीत केली होती़ यामध्ये दोन मराठा, एक बौद्ध व दोन मुस्लीम नगरसेवकांचा समावेश होता. या समितीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नाम फलकांसाठी चौकात जागा न देता दुसºयाच ठिकाणी शिफारस केल्याने लाखो शिवभक्त संतप्त झाल़े़

टॅग्स :agitationआंदोलनShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजnagaradhyakshaनगराध्यक्ष