शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जवळ असतानाही शहिदांच्या अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री उपस्थित नव्हते हे दुर्दैव : धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 19:54 IST

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांच्या प्रचाराचा प्रारंभ आज नांदेड येथून होत आहे.

नांदेड : पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात राज्यातील दोन जवान शहीद झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार सुरु असताना मुख्यमंत्री त्या ठिकाणापासून जवळच होते, परंतु ते त्या ठिकाणी गेले नाही हे दुर्दैव असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज केली. 

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांच्या प्रचाराचा प्रारंभ आज नांदेड येथून होत आहे. या निमित्ताने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत शहरातील इंदिरा गांधी मैदानावर संयुक्त सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले, दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या अंत्यसंस्कारा वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्या ठिकाणापासून जवळच होते. मात्र ते अंत्यसंस्काराला गेले नाहीत हे दुर्दैव आहे. पुलवामा येथील हल्ला झाला असाच भ्याड हल्ला शिवाजी राजांच्या काळात झाला होता. त्यावेळी शिवाजी राजे इशारे देत बसले नाही, त्यांनी  शाहिस्तेखानची याची बोटे छाटली. आता नियती आपल्या पाठीशी आहे, या निवडणुकीत विजय आपलाच होणार आहे अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. 

'अच्छे दिन' वर लोक हसतात प्रधानमंत्री मोदी यांनी जनतेला चांगल्या दिवसाचे स्वप्न दाखवले. प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख जमा होणार होते, 15 पैसे ही आले नाही, बजेट मध्ये शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार देतो असे आश्वासन दिले. परंतु या फसव्या घोषणांना आता जनता बळी पडणार नाही. भाजपच्या काळात महागाईचा डोंगर उभा राहिला आहे. आता कोणी चांगले दिवस येतील म्हणाले तर लोक हसतात, असे खुद्द गडकरी यांनीच कबुल केले असल्याचे मुंडे म्हणाले. 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेChief Ministerमुख्यमंत्रीNandedनांदेडpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला