छत्तीसगडच्या मजूर युवकाचा शॉक लागून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:31 IST2020-12-14T04:31:57+5:302020-12-14T04:31:57+5:30
तामिळनाडू राज्यातील बोअर मालक प्रभुसंगा टवेल एस. यांचे बोअर वाहन क्रमांक टीएनएल ३९ बीडी ५४१४ हे धर्माबाद तालुक्यात बोअर ...

छत्तीसगडच्या मजूर युवकाचा शॉक लागून मृत्यू
तामिळनाडू राज्यातील बोअर मालक प्रभुसंगा टवेल एस. यांचे बोअर वाहन क्रमांक टीएनएल ३९ बीडी ५४१४ हे धर्माबाद तालुक्यात बोअर मारण्यासाठी चालले होते. त्यांची एजन्सी पाटोदा (बु.) येथील बालाजी कुदळे यांच्यामार्फत चालू आहे. या बोअर गाडीवर छत्तीसगड राज्यातील नरेशकुमार भुरू यादव वय २२, रा.बठ्ठेजलाता, तालुका कारावेला, जिल्हा जसपूर येथील रहिवासी असलेला मजूर काम करतो. १२ रोजी दुपारी ३ वाजता तालुक्यातील करखेली येथील श्रीराम बाबूराव कटकाळू यांच्या शेतात बोअर मारण्यासाठी बोअर वाहन घेऊन जात असताना रस्त्यावरील पोलची तार वर उचलताना त्यास शॉक लागला. त्यात खाली पडल्याने धर्माबाद शासकीय रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच मृत्यू झाला. त्यावर रात्री साडेआठ वाजेपर्यंत पीएम करण्याची प्रक्रिया चालू होती. बातमी लिहीपर्यंत तपास जमादार बी. एम. जाधव, एस. जी. नागरगोजे पंचनामा करीत होते.