पाठलाग करून तलवारीने केले वार; नांदेडमध्ये पूर्ववैमनस्यातून एकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 14:58 IST2021-03-12T14:57:41+5:302021-03-12T14:58:54+5:30

Crime News मृत बाबा संतोकसिंघ नहेंल यांच्या पाठीवर तसेच मानेवर तलवारीचे वार दिसून आले आहेत.

Chased and attacked by sword; Murder of one out of prejudice in Nanded | पाठलाग करून तलवारीने केले वार; नांदेडमध्ये पूर्ववैमनस्यातून एकाचा खून

पाठलाग करून तलवारीने केले वार; नांदेडमध्ये पूर्ववैमनस्यातून एकाचा खून

नांदेड : शहरातील नगिनाघाट भागात पूर्ववैमनस्यातून एकाचा खून झाला. घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.

गुरुद्वारा लंगर साहिबच्या पाठीमागील बाजूस संतबाबा संतोकसिंघ नहेंल (वय ६५, रा. पंजाब) यांचा पूर्ववैमनस्यातून एकाने पाठलाग करून धारदार तलवारीचे घाव घालून खून केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच वजिराबाद पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तत्पूर्वीच हल्लेखोर तेथून पसार झाले होते.

मृत बाबा संतोकसिंघ नहेंल यांच्या पाठीवर तसेच मानेवर तलवारीचे वार दिसून आले आहेत. याप्रकरणी आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक गठीत केल्याची माहिती वजिराबाद पोलिसांनी दिली असून याप्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. आरोपीला लवकरच ताब्यात घेऊ, असा विश्वास वजिराबाद पोलिसांनी व्यक्त केला आहे.
 

Web Title: Chased and attacked by sword; Murder of one out of prejudice in Nanded