वांगी येथे महात्मा बसवेश्वर जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:16 AM2021-05-17T04:16:04+5:302021-05-17T04:16:04+5:30

लेबर कॉलनीतील पथदीवे बंद नांदेड- लेबर कॉलनीतील पथदिवे बंद असून या भागात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. संबंधित विभागाने ...

Celebration of Mahatma Basaveshwar Jayanti at Wangi | वांगी येथे महात्मा बसवेश्वर जयंती साजरी

वांगी येथे महात्मा बसवेश्वर जयंती साजरी

googlenewsNext

लेबर कॉलनीतील पथदीवे बंद

नांदेड- लेबर कॉलनीतील पथदिवे बंद असून या भागात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. संबंधित विभागाने पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी हाेत आहे. या भागात अंधाराचा फायदा घेवून भुरटे चोर सक्रीय झाले आहेत. नईआबादी, शिवाजीनगर भागातही पथदिवे बंद आहेत. या भागातील वारंवार वीज पुरवठा खंडीत असल्याने हा परिसर अंधारातच राहतो. याकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे.

सैलानी बाबाचा संदल कार्यक्रम रद्द

नांदेड- देगाव चाळ डंकीन भागात सैलानी बाबाची दर्गा असून याठिकाणी दरवर्षी संदल मिरवणूक काढण्यात येते. परंतु कोरोनामुळे यंदाही सैलानी बाबाचा संदर मिरवणुकीचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती पुजारी रघुबाबा यांनी दिली.

खताचे भाव वाढल्याने शेती खर्चात वाढ

नांदेड- लॉकडाऊनमुळे शेती व्यवसायावर संकट आले आहे. यातच डिझेलचे भाव वाढल्याने ट्रॅक्टरच्या सहायाने मशागत करण्याचा खर्च वाढला आहे. तसेच बियाणांचे, रासायनिक खताचे भाव वाढल्याने यावर्षी खरीप पेरणीचा खर्च आवाक्याबाहेर गेल्याने शेतकर्यांना खरीपाच्या पेरणीसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.

Web Title: Celebration of Mahatma Basaveshwar Jayanti at Wangi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.