सावधान कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:09 IST2021-02-05T06:09:07+5:302021-02-05T06:09:07+5:30

दरम्यान, मागील दोन दिवसांत आढळलेल्या रुग्णांमध्ये नांदेड शहरातील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. मध्यंतरी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटत चालली होती. ...

Caution The number of corona patients is increasing | सावधान कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय

सावधान कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय

दरम्यान, मागील दोन दिवसांत आढळलेल्या रुग्णांमध्ये नांदेड शहरातील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. मध्यंतरी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटत चालली होती. मात्र, बुधवारी ४८ नव्या रुग्णांची भर पडली. तर नांदेड शहरातील विवेकनगगर भागातील ७८ वर्षीय पुरुषाचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. गुरुवारी तपासणीचे १४८९ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ३८ अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे २४ तर ॲन्टीजेन तपासणीद्वारे १४ अहवाल बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरटीपीसीआरद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात १५, नांदेड ग्रामीणमध्ये ३, मुखेड २ तर भोकर, परभणी, किनवट आणि हिंगोली येथे प्रत्येकी १ बाधित आढळला आहे. तर ॲन्टीजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रातील १०, अर्धापूर ३ आणि जालना येथील १ बाधित निष्पन्न झाला आहे.

सध्या जिल्ह्यातील विविध रुग्णालयात ३१५ जणांवर उपचार सुरू आहेत. यातील १६ जणांवर विष्णूृपुरी येथील वैद्यकीय महाविद्यालयात १३ जणांवर, जिल्हा रुग्णालयात ९ जणांवर, जिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीत १६ जणांवर, महसूल कोविड केअर सेंटर येथे उपचार सुरू आहेत. तर मुखेड येथे ९, किनवट २, देगलूर ४, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणात १९६, जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरणात ३९ आणि खासगी रुग्णालयात ११ जणांवर उपचार सुरू आहेत.

चौकट----------------

बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण ९५.०८ टक्के

नांदेड जिल्ह्यात आजवर २ लाख ८ हजार १४२ जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले असून यातील तब्बल १ लाख ८१ हजार ४०७ जणांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झालेले आहेत. जिल्ह्यात आजवर २२ हजार ४९६ बाधित रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यातील २१ हजार ३१४ जणांनी कोरोनावर मात केलेली असून या रुग्णांना उपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी आणखी ३९५ स्वॅब तपासणी अहवाल प्रलंबित होते. दरम्यान, उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक म्हणजे ९५.०८ टक्के असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी सांगितले.

Web Title: Caution The number of corona patients is increasing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.