नांदेडात कारच्या काचा फोडल्या; महिनाभरातील दुसरी घटना
By श्रीनिवास भोसले | Updated: January 23, 2024 14:18 IST2024-01-23T14:17:57+5:302024-01-23T14:18:18+5:30
यापूर्वी ७ जानेवारी रोजी जवळपास दहा ते बारा चारचाकी वाहनांच्या काचा फोडून लाखोंचे नुकसान केले होते

नांदेडात कारच्या काचा फोडल्या; महिनाभरातील दुसरी घटना
नांदेड: भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीतील यशवंतनगर परिसरात अज्ञातांनी तीन कारच्या काचा फोडल्या. ही घटना सोमवारी रात्री घडली. नांदेड शहरातील ही तिसरी घटना असून महिन्यात या घटनेची पुनरवृत्ती झाली आहे.
काही दिवसापूर्वी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वसंतनगर, आनंदनगर भागात दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी या भागातील रहिवाशांच्या कारच्या काचा फोडून धुमाकुळ घातला होता . ७ जानेवारी रोजी ही घटना घडली होती. जवळपास दहा ते बारा चारचाकी वाहनांच्या काचा फोडून लाखोंचे नुकसान केले होते. दारूच्या नशेत दोघांनी हे कृत्य केल्याचे उघड झाले होते. त्यापूर्वी हनुमानगड परिसरात देखील घरासमोरील वाहनांचे नुकसान केले होते.
ह्या घटना ताज्या असतानाच यशवंतनगर भागात अज्ञात व्यक्तीने तीन कारच्या काचा फोडल्या आहेत. पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुढील तपास करत आहेत.