उमेदवार काँग्रेसचाच, मात्र नाव गुलदस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:21 IST2021-08-26T04:21:18+5:302021-08-26T04:21:18+5:30

गाडी फोडण्यामागे नेमका दुश्मन कोण? नायगावचे भाजप आमदार राजेश पवार यांचे वाहन रातोळी येथे फोडण्यात आले. या मागे नेमका ...

The candidate is from Congress, but his name is in the bouquet | उमेदवार काँग्रेसचाच, मात्र नाव गुलदस्त्यात

उमेदवार काँग्रेसचाच, मात्र नाव गुलदस्त्यात

गाडी फोडण्यामागे नेमका दुश्मन कोण?

नायगावचे भाजप आमदार राजेश पवार यांचे वाहन रातोळी येथे फोडण्यात आले. या मागे नेमका उद्देश काय, केवळ दहशत पसरविणे, संताप व्यक्त करणे की आणखी काही, याची चर्चा होऊ लागली आहे. गाडी फोडण्यामागे नेमका दुश्मन कोण असावा, याबाबतही तर्क लावले जात आहेत. आमदाराची गाडी पक्षाच्याच दुसऱ्या आमदाराच्या घरापुढे फोडली गेल्याने, राग नेमका कोणत्या आमदारावर, असा मुद्दाही उपस्थित केला जात आहे.

चौकट....

आयुक्तालयाचा मार्ग सुकर होईल का?

प्रस्तावित विभागीय महसूल आयुक्तालय नांदेडमध्ये की लातूरमध्ये? या राजकीय वादात अडकले आहे. मंगळवारी पत्रपरिषदेत अशोकराव चव्हाण यांना या मुद्द्यावर बोलते केले असता, मंत्री अमित देशमुख आणि मी आपसात बसून त्यावर तोडगा काढू, असे उत्तर ना.चव्हाण यांनी दिले. या दोन नेत्यांच्या तडजोडीतून खरोखरच विभागीय महसूल आयुक्तालय स्थापन्याचा मार्ग सुकर होईल का, याकडे जनतेच्या नजरा लागल्या आहेत.

Web Title: The candidate is from Congress, but his name is in the bouquet