CAA : नांदेडमध्ये नागरिकत्व संशोधन कायद्याच्या समर्थनार्थ मोर्चा; २०० मीटर राष्ट्रध्वज घेऊन आंदोलक रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 14:56 IST2019-12-23T14:51:19+5:302019-12-23T14:56:57+5:30

यावेळी भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. 

CAA : In Nanded march in support of citizen amendment bill of Hindu organizations | CAA : नांदेडमध्ये नागरिकत्व संशोधन कायद्याच्या समर्थनार्थ मोर्चा; २०० मीटर राष्ट्रध्वज घेऊन आंदोलक रस्त्यावर

CAA : नांदेडमध्ये नागरिकत्व संशोधन कायद्याच्या समर्थनार्थ मोर्चा; २०० मीटर राष्ट्रध्वज घेऊन आंदोलक रस्त्यावर

ठळक मुद्देमोर्चात 200 मीटर लांबीचा तिरंगा ध्वज घेऊन कार्यकर्ते सहभागी

नांदेड- नागरिकत्व संशोधन कायद्याच्या समर्थनार्थ नांदेड मध्ये आज विविध हिंदू संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. 

सकाळी 10 वाजता गाडीपुरा येथील रेणुकामाता मंदिरात आरती नंतर मोर्चाला सुरवात करण्यात आली. मोर्चात 200 मीटर लांबीचा तिरंगा ध्वज घेऊन कार्यकर्ते घोषणाबाजी करीत होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालया समोर झालेल्या सभेत कायद्याच्या विरोधात निघालेल्या मोर्चातील हिंसेचा निषेध करण्यात आला. हिंसा करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. लाखोंचे 52 मोर्चे शांततेत काढणाऱ्या मराठा समाजाचे यावेळी कौतुक करण्यात आले. त्याचबरोबर मोदी जिंदाबादच्या घोषणा ही देण्यात आल्या

Web Title: CAA : In Nanded march in support of citizen amendment bill of Hindu organizations