शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

नात्यातील महिलेचा अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाची निर्घृण हत्या, डोहात फेकला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 15:52 IST

नात्यातील महिलेचा चोरून काढलेला व्हिडिओ तरुणाने मित्रांना दाखवला होता, त्यानंतर झाली हत्या

मनाठा (नांदेड): मार्लेगाव येथिल एका २१ वर्षीय तरुणाचा कोयत्याने वार करून खून केल्याची घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली आहे. निर्घृणरित्या हत्या करुन मृतदेह नदीकाठावरील बोरगाव शिवारातील डोहात फेकण्यात आला होता. सचिन मुरलीधर कदम असे मृत तरुणाचे नाव आहे. तो गुरुवारी सकाळपासून गायब होता.

सचिन मुरलीधर कदम तरुण गुरुवारी सकाळी १०:०० वाजता शेतात गेला होता. मात्र, सायंकाळपर्यंत तो घरी परतला नाही. नातेवाईकांनी शेतात आणि गावात सर्वत्र शोध घेऊनही तो आढळून आला नाही. त्यामुळे गावातील ३० ते ४० तरुणांनी त्याचा शोध नदीत घेतला, तिथेही तो आढळून आला नाही. त्यानंतर रात्री १० वाजेच्या दरम्यान नदीकाठावरील बोरगाव शिवारातील डोहात सचिनचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मनाठा पोलिसांना मिळाली. उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील कल्याण यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला. तपासानंतर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

नात्यातील महिलेचा अश्लील व्हिडिओ केल्याने हत्यासचिनने नात्यातील एका महिलेचा नको त्या अवस्थेतील व्हिडीओ शूट केला होता. त्यानंतर सचिनने तो व्हिडीओ एका मित्राला शेअर केला. या मित्राने व्हिडिओ ज्या महिलेचा होता तिच्या नातेवाईकास दाखवला. यावरून संतापलेल्या दोघांनी शेतात गेलेल्या सचिनचा भरदिवसा खून करून मृतदेह डोहात फेकून दिला. याप्रकरणी मृताचा भाऊ कृष्णा मुरलीधर कदम याच्या फिर्यादीवरुन हदगाव ठाण्यात मार्लेगाव येथील तातेराव कदम (७०), दिंगबर तातेराव कदम (४५) आणि शिवा सूर्यवंशी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेडDeathमृत्यू