शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

जाब विचारणाऱ्या दोघांना महाविद्यालयात डांबून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 00:33 IST

केंद्र शासनाच्या पंडित दिनदयाल योजनेअंतर्गत स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रामला प्रवेश घेतलेल्या एका विद्यार्थिनीचे संस्थेतील काही जणांनी एटीएम आणि पासबुक ठेवून घेतले होते़

ठळक मुद्देसात जणांवर गुन्हा दाखल योजनेच्या लाभासाठी एटीएम, पासबुक घेतले हिसकावून

नांदेड : केंद्र शासनाच्या पंडित दिनदयाल योजनेअंतर्गत स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रामला प्रवेश घेतलेल्या एका विद्यार्थिनीचे संस्थेतील काही जणांनी एटीएम आणि पासबुक ठेवून घेतले होते़ त्यातून त्यांनी व्यवहार केल्यानंतर विद्यार्थिनीच्या भावाने याबाबत त्यांना जाब विचारताच दोघांना जबर मारहाण करीत जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली़ याप्रकरणी सात जणांविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे़स्वाती अशोक सूर्यवंशी या विद्यार्थिनीने दिनदयाल योजनेअंतर्गत स्किल डेव्हलपमेंट अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला होता़ त्यानंतर संस्थेचे प्रभारी संजय मस्के आणि इंगोले यांनी प्रमाणपत्र नोंदविण्याची भीती दाखवित स्वाती यांचे पासबुक आणि एटीएम कार्ड स्वत:कडे ठेवून घेतले होते़ स्वातीला कुठलीही कल्पना न देता तिच्या खात्यातून व्यवहार करण्यात आले़ ही बाब स्वातीचा भाऊ चंद्रकांत सूर्यवंशी यांना समजल्यानंतर ६ जून रोजी ते संस्थेच्या कार्यालयात गेले होते़ यावेळी त्यांनी मस्के आणि इंगोले यांना एटीएम कार्ड आणि पासबुक का ठेवून घेतले? याबाबत विचारणा केली़ तसेच तसा शासन आदेश आहे काय? अशी चौकशी केली़परंतु यावेळी सूर्यवंशी यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली़ संस्थेच्या अध्यक्षाला भेटू देण्याची त्यांनी विनंती केली़ परंतु, त्यासाठी त्यांना प्रतीक्षा करण्यास सांगण्यात आले़ थोड्याच वेळात त्या ठिकाणी आलेल्या इतर चार ते पाच जणांनी सूर्यवंशी त्यांचा मित्र संदीप गजभारे यांना जातीवाचक शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली़याप्रकरणी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात संजय मस्के, इंगोले यासह इतर पाच जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मारहाणीच्या घटनेचा अधिक तपास ग्रामीण पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे.दिनदयाळ योजनेबाबत प्रश्नचिन्हकेंद्र शासनाच्या वतीने युवकांना तांत्रिक मार्गदर्शन देवून स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी दिनदयाळ पंडित डेव्हलपमेंट कार्यक्रम राबविण्यात येतो. मात्र लाभार्थी प्रशिक्षणार्थिचे पासबुक आणि एटीएम कार्ड काढून घेतल्याचा प्रकार या घटनेतून पुढे आल्याने सदर योजनेबाबतच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या योजनेच्या सखोल चौकशीची मागणी होत आहे.

टॅग्स :NandedनांदेडEducationशिक्षणCrime Newsगुन्हेगारीStudentविद्यार्थी