नांदेडात वजिराबाद येथील बुक स्टॉल आगीच्या भक्ष्यस्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 12:01 IST2018-07-14T12:00:13+5:302018-07-14T12:01:13+5:30

शहरातील वजिराबाद भागात असलेल्या बुक सेंटरला आज सकाळी सात वाजेच्या सुमारास आग लागली.

Bookstore firefighters at Nandedat Wajirabad | नांदेडात वजिराबाद येथील बुक स्टॉल आगीच्या भक्ष्यस्थानी

नांदेडात वजिराबाद येथील बुक स्टॉल आगीच्या भक्ष्यस्थानी

नांदेड : शहरातील वजिराबाद भागात असलेल्या जांबकर बुक सेंटरला आज सकाळी सात वाजेच्या सुमारास आग लागली. दरम्यान, अग्निशमन दलाच्या तासाभराच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. 

या बाबत अधिक माहिती अशी कि, पहाटेच्या सुमारास दुकानातून धूर निघत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. याची माहिती त्यांनी अग्निशमन दलास दिली. अग्निशमन दलाचे प्रमुख शेख रईस पाशा यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तब्बल तासभरानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आगीत दुकानातील पुस्तके, फर्निचर जळून खाक झाले आहेत. नुकसानीचा आकडा कळाला नसून अंदाजित लाख रुपयांचे नुकसान झाले असेन ,अशी माहिती मिळाली आहे. 

Web Title: Bookstore firefighters at Nandedat Wajirabad