शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
2
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
3
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
4
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
5
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
6
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
7
अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
8
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
9
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
10
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
11
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
12
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
13
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
14
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
15
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
16
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
17
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
18
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
19
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
20
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
Daily Top 2Weekly Top 5

भाजपची पुणे-पिंपरीत राष्ट्रवादीशी मैत्रिपूर्ण लढत; मनभेद टाळू; चंद्रशेखर बावनकुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 12:48 IST

काँग्रेस पार्टीला सोबत घ्यायला कोणी तयार नाही. महाविकास आघाडीतून काँग्रेसला बाहेर काढण्यात आले.

नांदेड : पुणे - पिंपरीत अजित पवार हे ३०-३५ वर्षांपासून काम करीत आहेत. ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. भाजपाचेही त्या ठिकाणी मोठे काम आहे. दोन्ही पक्षांकडून कार्यकर्तेही आहेत. एकत्र लढल्यावर जागाच उरत नाहीत. त्यामुळे आम्ही एकत्रित बसून निर्णय घेतला. अजितदादांनी स्वतंत्र लढावे आणि भाजपा महायुती म्हणून लढू. परंतु, या ठिकाणी मैत्रिपूर्ण लढत होईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

महसूल मंत्री बावनकुळे हे मंगळवारी नांदेडात आले होते. ते म्हणाले, निवडणूक लढविताना सर्वस्व पणाला लावावे लागते. शेवटी दादांना पक्षाची लढाई लढताना त्यांना निवडणुकीसारखीच निवडणूक लढवावी लागणार आहे. आम्हीही सर्वस्व पणाला लावू. शेवटी मैत्रिपूर्ण लढलो तरी, त्यांना आणि आम्हालाही निवडणुका जिंकायच्या आहेत. त्यांचे म्हणणे आहे महापौर राष्ट्रवादीचा होईल, आमचे म्हणणे आहे भाजपा महायुतीचा होईल. अजितदादांचे कार्यकर्ते किंवा अजितदादा महायुतीवर टीका टिप्पणी करणार नाहीत. महायुतीही त्यांच्यावर टीका करणार नाही. मनभेद तयार होणार नाहीत, याची काळजी आम्ही घेऊ, असे बावनकुळे म्हणाले.

काँग्रेसला सोबत घ्यायला कोणी तयार नाहीकाँग्रेस पार्टीला सोबत घ्यायला कोणी तयार नाही. महाविकास आघाडीतून काँग्रेसला बाहेर काढण्यात आले. त्यामुळे वेगळे लढायची, त्यांची मानसिकता झाली आहे. आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे कधीही काँग्रेसच्या दावणीला जाण्याचा विचार करणार नाहीत. एका काळात उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचा अजेंडा स्वीकारला होता. आता त्यांनाही वाटत आहे की, काँग्रेससोबत गेल्याने आपली पार्टी संपत चालली आहे, असेही बावनकुळे म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP, NCP to have friendly fight in Pune-Pimpri: Bawankule

Web Summary : BJP and NCP will have a friendly contest in Pune-Pimpri local elections. Bawankule stated that this decision was made as both parties have strong local presence. No party will criticize each other to maintain harmony.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेसChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळे