शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाची लढत वंचितसोबतच; विरोधीपक्ष नेताही वंचितचाच दिसेल : देवेंद्र फडणवीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2019 14:40 IST

शरद पवारांनी काळाची पावले ओळखावीत

ठळक मुद्देपदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीत भविष्य असल्याचे  वाटत नसल्यानेच ते पक्ष सोडत आहेत़ निकाल पाहिल्यानंतर वंचितची टीम ए तर काँग्रेसची टीम बी झाल्याचे स्पष्ट

नांदेड : शरद पवार मोठे नेते आहेत त्यामुळे त्यांच्यावर मी भाष्य करणार नाही, मात्र त्यांचा पक्ष अगोदरच ठराविक भागात मर्यादित होता़  अलिकडील दिवसात पंतप्रधान मोदींच्या कामावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीतील अनेकजण भाजपामध्ये येत आहेत़ या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीत भविष्य असल्याचे  वाटत नसल्यानेच ते पक्ष सोडत आहेत़ पवारांनी ही काळाची पावले ओळखली पाहिजेत अशी टिप्पणी करीत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपाची खरी लढत वंचित बहुजन आघाडीसोबत असेल़ निवडणुकीनंतर विरोधी पक्ष नेताही वंचितचाच दिसेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी केले़

शनिवारी सकाळी नांदेड येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते़  यावेळी कामगार मंत्री सभांजी पाटील निलंगेकर, भाजपा प्रदेश महासचिव आ़ सुजितसिंह ठाकूर, प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये, खा़ प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हाध्यक्ष आ़ राम पाटील रातोळीकर, शहर महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते आदी उपस्थित होते़ आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपाची शंभर टक्के युती राहिल, असे स्पष्टीकरणही फडणवीस यांनी यावेळी दिले़ नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशावर शिवसेनेने आक्षेप घेतल्याबाबत विचारले असता, नारायण राणे हे सध्या भाजपमध्येच आहेत, ते भाजपाचे विद्यमान खासदार आहेत़  त्यांचा पक्ष भाजपामध्ये विलीन करण्याचा विषय आहे़ याबाबतचा निर्णय शिवसेनेला विश्वासात घेवून करण्यात येईल असे ते म्हणाले़ लोकसभा निवडणुकीत काँग्रेस वंचित बहुजन आघाडीवर भाजपाचा बी टीम असल्याचा आरोप करीत होती, परंतु लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहिल्यानंतर वंचितची टीम ए तर काँग्रेसची टीम बी झाल्याचे स्पष्ट झाले आहे़  विधानसभा निवडणुकीतही आमचा खरा सामना वंंचितसोबतच रंगेल असे ते म्हणाले़ 

पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी मागील पाच वर्षात केलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली़ केंद्रिय गृहनिर्माण मंत्रालयाने नुकतीच तीन लाख घरांना मंजुरी दिली आहे़ यातील सव्वालाख घरे महाराष्ट्रासाठी आहेत़  आजवर राज्यातील ११ लाख २० हजार बेघरांना आवास योजनेच्या माध्यमातून घरे दिल्याचे सांगत या योजनेअंतर्गत पुढील वर्षीपर्यंत उद्दिष्ट पूर्ण करण्यात येईल याबरोबरच २०११ च्या बेसलाईन सर्वेत ज्यांची नावे आलेली नाहीत, नव्याने सर्वे करून अशांना या यादीत समाविष्ट करून घेण्यात येत आहे़ या सर्वांनाही २०२२ पर्यंत हक्काची घरे मिळतील असे त्यांनी सांगितले़ बाभळी बंधाऱ्याचे पाणी तेलंगणात वाहून जात आहे़ याचा कोणताही फायदा महाराष्ट्रातील भागाला मिळत नाही़ आॅक्टोबरअखेर गेट  टाकणे चुकीचेच आहे़ आम्ही याबाबत सर्वोच्च न्यायालयात जात आहोत़  दुसरीकडे तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांशीही चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले़

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीBJPभाजपाvidhan sabhaविधानसभा