शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा कार्यकर्त्यांची शेतकऱ्यास धक्काबुकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 00:42 IST

तालुक्यातील बन्नाळी येथील शेतकरी तथा शिवा संघटनेचे कार्यकर्ते दिगंबर शंकरराव खपाटे यांना भाजपाचे प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य राजेश पवार यांच्या सुरक्षा रक्षकाकडून व कार्यकर्त्यांकडून सोमवारी धक्काबुकी करण्यात आली़ दरम्यान, या प्रकरणी दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़

धर्माबाद : तालुक्यातील बन्नाळी येथील शेतकरी तथा शिवा संघटनेचे कार्यकर्ते दिगंबर शंकरराव खपाटे यांना भाजपाचे प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य राजेश पवार यांच्या सुरक्षा रक्षकाकडून व कार्यकर्त्यांकडून सोमवारी धक्काबुकी करण्यात आली़ दरम्यान, या प्रकरणी दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़धर्माबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना बँकेत अधिकारी व कर्मचाºयांकडून कामात अडवणूक होत असल्याच्या तक्रारी तसेच शासनाने केलेल्या कर्ज माफी व पीककर्जाची माहीती घेण्यासाठी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य राजेश पवार यांनी सोमवारी येथील विविध बँकेत जाऊन मॅनेजर यांची भेट घेतली़ यावेळी महाराष्ट्र बँकेत बन्नाळी येथील शेतकरी दिगंबर खपाटे यांनी राजेश पवार यांना आतापर्यत किती शेतकºयांना कर्जमाफी मिळाली असल्याचे विचारले़ तेव्हा पवार यांनी मला माहिती विचारू नकोस नरेंद्र मोदी यांना विचार असे सांगितले़ मात्र हे माझ्या प्रश्नाचे उत्तर नसल्याचे खपाटे यांनी सांगताच पवार यांच्या सुरक्षा रक्षक व एका भाजपा कार्यकर्त्याने त्यांना धक्काबुकी करून बँकेच्या बाहेर काढले़ या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी काही शेतकºयांनी राजेश पवार यांची गाडी अडवली़ परंतु पवार गाडीत बसून शेतकºयांना बोलत असताना पुन्हा खपाटे यांना कार्यकर्त्यांकडून धक्काबुकी करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे़ या घटनेची माहिती शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर धोंडे यांना कळाल्यानंतर त्यांनी या घटनेचा निषेध केला़ सदरील आरोपीवर कारवाई न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला़ पोलिसांनी घटनेची दखल घेवून येथील बाजार समितीचे तज्ज्ञ संचालक अशोक वडजे, नागेश कहाळेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे़ दरम्यान, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष बाजार समितीचे संचालक अशोक वडजे यांनी दिगंबर खपाटे व ललेश संगावार यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पोलिसात दिली आहे़

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीNanded policeनांदेड पोलीसBJPभाजपाFarmerशेतकरी