शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

भाजप प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव खतगावकर कॉंग्रेसच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2021 13:31 IST

Bhaskarrao Khatgaonkar : भाजपमध्ये आपल्याला न्याय मिळाला नाही. पुढे आपण काय निर्णय घ्यावा यावर विचार करण्यासाठी झाली खास बैठक

ठळक मुद्देखतगावकर जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहीलआम्ही कोणत्याची पक्षांशी बांधील नाहीतअशी भूमिका या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी माडंली.

नांदेड : माजी मंत्री तथा भाजपचे ( BJP ) प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव खतगावकर ( Bhaskarrao Khatgaonkar) लवकरच कॉंग्रेसमध्ये ( Congress )जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. गुरुवारी त्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची बैठक शंकरनगर ( ता. बिलोली ) येथे झाली. 

भाजपमध्ये आपल्याला न्याय मिळाला नाही. पुढे आपण काय निर्णय घ्यावा यावर विचार करण्यासाठी ही बैठक खतगावकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. खतगावकर जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील, आम्ही कोणत्याची पक्षांशी बांधील नाहीत, अशी भूमिका या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी माडंली. मेळाव्याला बिलोली तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत खातगावकरांनी अंग काढून घेतल्याचा फटका भाजप उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे. 

अशोकराव चव्हाण यांचे मेहुणेराज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण ( Ashok Chavhan ) यांच्या बहीण स्नेहलता यांचे खतगावकर हे पती आहेत. तीन वेळा बिलोलीतून आमदार व नांदेडचे खासदार म्हणून खतगावकर निवडून आले. राज्यमंत्री राहिले. सात वर्षांपूर्वी अशोकराव चव्हाण यांच्या  कार्यपद्धतीवर ठपका ठेवत त्यांनी कॉंग्रेस सोडली होती. दरम्यान,  सूर्यकांता पाटील, डॉ. माधवराव किन्हाळकर यांच्यासह खतगावकरांचीही भाजपने उपेक्षाच केल्याचे चित्र आहे.

भाजपने स्नुषा डॉ. मीनल यांना उमेदवारी नाकारली भाजपमध्ये विनाअट प्रवेश केलेल्या भास्करराव पाटील-खतगावकर यांनी जिल्ह्यातील अनेक काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस समर्थकांना भाजपमध्ये आणले. याचा फायदा भाजपला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत झाला. मात्र, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत नायगांव मतदारसंघातून खतगावकर यांच्या स्नुषा डॉ. मीनल खतगावकर यांना भाजपने उमेदवारी डावलली होती. तेव्हापासून त्यांची भाजप श्रेष्ठींच्या विरोधात नाराजी वाढत गेली असल्याची चर्चा आहे.

 

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाणNandedनांदेड