बिटकॉईनचे गुंतवणूकदार हवालदिल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 04:03 IST2018-12-10T04:03:01+5:302018-12-10T04:03:17+5:30
गेन बिटकॉईनने नांदेडकरांना कोट्यवधींनी गंडविणाऱ्या अमित भारद्वाज याला पुणे पोलिसांनी पकडले. त्यानंतर देशभरात २५ हून अधिक ठिकाणी या प्रकरणात त्याच्यावर गुन्हे नोंद झाले.

बिटकॉईनचे गुंतवणूकदार हवालदिल
नांदेड : गेन बिटकॉईनने नांदेडकरांना कोट्यवधींनी गंडविणाऱ्या अमित भारद्वाज याला पुणे पोलिसांनी पकडले. त्यानंतर देशभरात २५ हून अधिक ठिकाणी या प्रकरणात त्याच्यावर गुन्हे नोंद झाले. पण फसवणुकीच्या रकमेची वसुली करण्यात यंत्रणेला यश आले नसल्यामुळे नांदेडमधील गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत.
अदृश्य चलनाच्या मायाजालात ओढत गेट बिटकॉईनच्या माध्यमातून अमित भारद्वाज याने नांदेडकरांना गंडविले. नांदेडातील फसवणुकीचा हा आकड तब्बल शंभर कोटीपर्यंत गेला आहे़ अमित भारद्वाज याने ओळखीचा फायदा घेत नांदेडात अनेकांशी संपर्क साधून त्यांच्याकडील बिटक्वॉईन घेतले होते़ नांदेडातील अनेक प्रतिष्ठितांनी यामध्ये गुंतवणुक केली असून त्यांच्याही तोंडचे पाणी पळाले आहे़