शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
3
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
4
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
5
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
6
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
7
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
8
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
9
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
10
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
11
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
12
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
13
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
14
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
15
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
16
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
17
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

मुलींचा जन्मदर घसरला; नांदेड जिल्ह्यात १००० मुलांमध्ये केवळ ८८८ मुली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 4:57 PM

राष्ट्रीय कौटुंबिक अहवालातील आकडेवारी 

ठळक मुद्देमुलींच्या जन्मदराबाबत चिंता 112 जणांना मिळणार नाही जोडीदार

- शिवराज बिचेवारनांदेड : शासनाकडून मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी दरवर्षी वेगवेगळ्या योजनांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येतो. परंतु २०१५ पेक्षाही २०२० मध्ये एका सर्वेक्षणानुसार हजार मुलांमागे मुलींच्या जन्माचे प्रमाण हे ८८८ एवढे आहे. त्यामुळे ११२ मुलांना भविष्यात जोडीदार मिळणे अवघड आहे. 

आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामीण व शहरी भागात दिल्या जाणाऱ्या विविध आरोग्य विषयक सेवा व प्रसूती, लसीकरण, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया निर्देशांकाची माहिती दर महा आरोग्य व्यवस्थापन माहिती केंद्र तसेच शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर टाकली जाते. २०११ मध्ये हे प्रमाण ९४३ एवढे होते. २०१५-२०१६ या वर्षात मुलींच्या जन्माचा दर हा ९४३ एवढा होता. तर १९९१ मध्ये तो ९४५ होता. आतापर्यंत जिल्ह्यात पीसीपीएनडीटी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. यामध्ये जिल्ह्यात कार्यरत असलेल्या सोनोग्राफी सेंटरची आरोग्य विभागाकडून नियमित तपासणी करण्यात येते. 

तसेच प्रत्येक सोनोग्राफी सेंटरला करण्यात येणाऱ्या प्रत्येक तपासणीची माहिती इत्यंभूत माहिती ऑनलाईन पोर्टलवर टाकणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी किती आणि कोणत्या कारणासाठी सोनोग्राफी करण्यात येतात हे स्पष्ट होते. सोनोग्राफी सेंटरची जिल्हा सल्लागार समितीच्या वतीने तपासणी करण्यात येते. तसेच मुलींचा जन्मदर वाढविण्याबाबत वेळोवेळी जनजागृती केली जाते. परंतु या सर्व उपाययोजना करुनही जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात वाढ झाली नाही असे दिसून येते. त्यामुळे भविष्यात हजार मुलांमध्ये जवळपास ११२ मुलांना जोडीदार मिळण्याची शक्यता कमीच आहे.

बालकांचे लसीकरणग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये नियमितपणे बालकांचे लसीकरण करण्यात येते. जन्मानंतर ठरवून दिलेल्या महिन्यात त्यांच्या लसीकरणासाठी दिवस निश्चित करण्यात आला आहे. शाळेतील मुलींचे प्रमाण वाढविण्यासाठीही जि.प.कडून आता मोहिम सुरु होणार आहे. 

महिलांसाठी आरोग्यसेवाजिल्हा परिषदेकडून महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येते. गरोदरपणात त्यांची नियमित तपासणी करण्यात येते. त्याचबरोबर अत्यावश्यक असलेली औषधी त्यांना देण्यात येते. त्याचा  मुख्य कार्यकारी अधिकारी आढावा घेतात.

समिती शोध घेणार महिलांचे हिमोग्लोबीनच्या गोळ्या वाटप, शाळाबाह्य मुलींचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मुलींचा जन्मदर नेमक्या कोणत्या कारणामुळे कमी झाला याबाबत समितीची स्थापना करण्यात येणार आहे. गर्भपातात होतात काय? याचीही तपासणी करण्यात येणार आहेत. - वर्षा ठाकूर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.

टॅग्स :NandedनांदेडNanded zpनांदेड जिल्हा परिषद