नांदेडात 'बर्ड फ्लू'; मृत कोंबड्यांचा अहवाल आला पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 17:37 IST2025-01-26T17:36:23+5:302025-01-26T17:37:47+5:30

लोहा तालुक्यातील पिवळा परिसरात कोंबडी तसेच काही ठिकाणी कावळे मृतावस्थेत आढळले.

Bird flu in Nanded Report of dead chickens comes positive | नांदेडात 'बर्ड फ्लू'; मृत कोंबड्यांचा अहवाल आला पॉझिटिव्ह

नांदेडात 'बर्ड फ्लू'; मृत कोंबड्यांचा अहवाल आला पॉझिटिव्ह

नांदेड : लोहा तालुक्यातील किवळा येथे सहा दिवसांपूर्वी मृतावस्थेत आढळलेल्या कोंबड्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सदर कुकुट पक्षांना बर्ड फ्लू ची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातूनच यांचा मृत्यू झाला असल्याचे अहवालात म्हटले आहे त्यामुळे पिवळा परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. 

लोहा तालुक्यातील पिवळा परिसरात कोंबडी तसेच काही ठिकाणी कावळे मृतावस्थेत आढळले. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत मृत कुकुट पक्षांचे नमुने गोळा करून ते राज्यस्तरीय पशुरोग अन्वेषण प्रयोगशाळा पुणे आणि भोपाळ येथील कृषी अनुसंधान परिषद, राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. सदर नमुने पॉझिटिव्ह आले असून कुकुट पक्षांचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू स्पष्ट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी किवळा येथील दहा किलोमीटर परिसरात जिल्हा प्रशासनाच्या वतीने अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून ५६५ कुकुट पशुसंवर्धन विभागाने ताब्यात घेतले असून त्यांची आता शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली जाणार आहे. 

किवळा येथील कुकुट पालन केंद्रातील काही कुक्कुट पक्षांमध्ये मरतूक आढळला. त्या पक्षांचे जिल्हा पशुसंवर्धन विभागाने नमुने घेऊन ते प्रयोग शाळेला पाठवले. हे सर्व नमुने आता पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात बर्ड फ्लूचा उद्भव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या आदेशान्वये किवळा येथील परिसर दहा किलोमीटरपर्यंत अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. 

प्रभावित क्षेत्रात जिवंत व मृत कुक्कुट पक्षी, अंडी, कोंबडीखत, पक्षीखाद्य, अनुषंगिक साहित्य व उपकरणे ई. च्या वाहतूकीस मनाई करण्यात आली आहे. प्रभावित पोल्ट्री फार्मच्या परिसरात नागरिकांच्या हालचालीस, तसेच ईतर पक्षी आणि प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आली आहे. प्रभावित पोल्ट्री फार्मचे प्रवेशद्वार आणि परिसर २ टक्के सोडियम हायपोक्लोराईट किंवा पोटॅशियम परमॅग्नेटने निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रभावित क्षेत्राच्या ५ कि.मी. त्रिज्येतील परिसरात कुक्कुट पक्ष्यांची खरेदी-विक्रीची दुकाने, व कुक्कुट मांसाची चिकन दुकाने, वाहतूक, बाजार व यात्रा, प्रदर्शन आदी बाबी बंद राहतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: Bird flu in Nanded Report of dead chickens comes positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.