शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खतगावकरांची काँग्रेस ‘एंट्री’ कोणाच्या पथ्यावर? देगलूर पोटनिवडणुकीत कोण बाजी मारणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2021 16:41 IST

काँग्रेस नेते तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांच्या प्रचारासाठी सुरूवातीपासून ते शेवटच्या टप्प्यापर्यंत नियोजनबद्ध पद्धतीने प्रचार यंत्रणा राबविण्यात आली.

- श्रीनिवास भोसलेनांदेड :  देगलूर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत ऐनवेळी माजी खा. भास्करराव खतगावकर यांनी केलेला काँग्रेस प्रवेश भाजपसह मूळ काँग्रेस कार्यकर्त्यांनाही रूचला नाही. दादांच्या प्रवेशाने जितेशचा विजय निश्चित असल्याचे काँग्रेस नेत्यांनी सभेत सांगितले. परिणामी स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांना आपले अस्तित्व संपुष्टात येण्याची भीतीने त्यांनी प्रचारापासून एक पाऊल मागे राहणे पसंत केले. त्यामुळे दादांची काँग्रेस एंट्री कोणाच्या पथ्यावर पडेल, हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल.

कॉँग्रेसचे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाने पोटनिवडणूक झाली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने देगलूरची जागा काँग्रेसला राहिली. त्या ठिकाणी काँग्रेसने दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी दिली. तर, भाजपकडून शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना उमेदवारी दिली. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीने डॉ. उत्तम इंगोले यांना उमेदवारी दिली. दरम्यान, देगलूरच्या निवडणुकीत महाविकास आघाडीविरोधात भाजप असेच चित्र निर्माण झाले.

काँग्रेस नेते तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांच्या प्रचारासाठी सुरूवातीपासून ते शेवटच्या टप्प्यापर्यंत नियोजनबद्ध पद्धतीने प्रचार यंत्रणा राबविण्यात आली. देश, राज्य पातळीवर नेत्यांच्या प्रचारसभा आणि महाविकास आघाडी सरकार राज्यात असल्याने मतदार संघाचा होणारा विकास, अंतापूरकर कुटुंबीयांबद्दल असलेली सहानुभूती हे मुद्दे जितेश अंतापूरकरांचा विजयश्री खेचून आणतील, असा विश्वास काँग्रेस गोटातून व्यक्त होत आहे. तर शेवटच्या टप्प्यात भाजपने प्रचाराला गती देत खासदार प्रतापराव चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या आयुधांचा वापर केला. आरएसएस, हिंदूत्ववादी संघटना, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनीही भाजपच्या उमेदवारासाठी ग्राऊंड लेव्हलवर मेहनत घेतली. त्यातच वंचित बहुजन आघाडीने प्रचारात कोणतीही कसर सोडली नाही. त्यात ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रचारसभांना मिळालेल्या प्रतिसादाने वंचितच्या कार्यकर्त्यांना शेवटच्या टप्प्यात बळ मिळल्याने त्यांच्यात उत्साह संचारला होता. दरम्यान, आरपीआय खोब्रागडे गटाचे उमेदवार, जनता दल सेक्युलर आणि इतर अपक्ष उमेदवारांच्या मतविभाजनाचा फटका काँग्रेससाठी डोकेदुखी ठरणार आहे.

भाजप-काँग्रेसपेक्षाही दादांच्या प्रतिष्ठेचा प्रश्नमाजी खासदार भास्करराव खतगावकर यांच्या प्रवेशाने जितेश यांचा विजय निश्चित असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी केले. प्रचारादरम्यान निकालापूर्वी विजयाचे श्रेय दादांना दिल्याने स्थानिक काँग्रेस पदाधिकारी नाराज झाले. काँग्रेस विजयी झाली तर, दादांचीच ताकद वाढेल या भीतीने  काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी प्रचारात शांत राहणे पसंत केले. तर, दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खुद्द खतगावकर यांच्या सोडचिठ्ठीमुळे आम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागेल, असे वक्तव्य केले. त्यामुळे काँग्रेससह भाजपच्या जय-पराजयाचे बोल दादांवरच येणार आहेत.

निसटत्या फरकाने जिंकेल ?महाविकास आघाडी सरकारविषयी असलेली नाराजी, माजी खासदार खतगावकर यांच्या एंट्रीने नाराज काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपला छुप्या पद्धतीने दिलेली साथ, काँग्रेस उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी कत्तलखान्याबद्दल केलेले भाष्य आणि सेक्युलर मतांच्या विभाजनाचा फायदा भाजपला होऊन सुभाष साबणे यांचा निसटत्या फरकाने विजय होईल, असे भाजप कार्यकर्ते बोलत आहेत. 

१२ उमेदवारांनी लढवली निवडणूक २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत कॉँग्रेसचे दिवंगत रावसाहेब अंतापूरकर हे २२ हजार ४३३ मतांनी विजयी झाले होते. त्यावेळी अंतापूरकरांना ८९ हजार  ४०७ मते मिळाली होती. तेव्हा शिवसेनेत असलेले सुभाष साबणे यांना ६६ हजार ९७४ मते मिळाली होती. ते दुसऱ्यास्थानी होते. याच निवडणुकीत तिसऱ्या स्थानी असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या रामचंद्र भरांडे यांना १२ हजार ५७ मते मिळाली होती. २०१९ मध्ये अपक्ष उमेदवार असलेले बालाजी बांडे यांना ३ हजार ५२३ मते मिळाली होती. २०१९ पेक्षा नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीची परिस्थिती फार वेगळी आहे. यावेळी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह १२ जणांनी ही निवडणूक लढविली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीसह इतर अपक्षांमुळे होणाऱ्या मतविभाजनाचा  फटका काँग्रेसला बसेल, असे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.   

टॅग्स :deglur-acदेगलूरAshok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपाcongressकाँग्रेस