शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

२३ मार्चला भास्करराव खतगावकरांच्या मनगटी घड्याळ; अजित पवारांच्या उपस्थितीत होणार प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 19:27 IST

काँग्रेसमध्येही मला खूप मानसन्मान मिळाला. परंतु राजकारण करताना परिस्थिती अशी होते की त्यावेळी पक्ष बदलावा लागतो.

नांदेड : माजी खासदार भास्करराव खतगावकर यांच्यासह मीनल खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला असून, येत्या २३ मार्चला नरसी येथील जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही मंडळी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती आमदार प्रतापराव चिखलीकर यांनी दिली.

चिखलीकर म्हणाले, खतगावकर यांनी अनेक वर्षे राज्यात, देशात नांदेडचे लोकप्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाचा राष्ट्रवादीला फायदा होणार आहे. २३ मार्च रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, नवाब मलिक, बाबासाहेब पाटील या नेत्यांची नरसी येथील कार्यक्रमाला उपस्थिती राहणार आहे. महायुतीत आजपर्यंत फक्त भाजपने निलंबित केलेल्या मंडळींनाच राष्ट्रवादीत घेण्यात आले आहे. शिंदे गट किंवा भाजपच्या इतर मंडळींना पक्षात प्रवेश दिला नाही. महायुती भक्कम असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्यपातळीवर नेते जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य राहणार आहे. सत्ता केंद्र वसंतनगर राहणार की राजेंद्रनगर, हा मुद्दा नाही. खतगावकर हे ज्येष्ठ नेते आहेत. आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू. मी आता राष्ट्रवादीत थांबणार असून, ज्या-ज्या पक्षात आजपर्यंत गेलो, त्या ठिकाणी मी प्रामाणिकपणे काम केले आहे. त्यामुळे आमची कुणाशीही स्पर्धा नाही, असेही चिखलीकरांनी स्पष्ट केले.यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, बाळासाहेब रावणगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार अविनाश घाटे, माजी आमदार मोहन हंबर्डे, मीनल खतगावकर, रामदास पाटील, जीवन घोगरे यांची उपस्थिती होती.

शिंदेसेनेकडूनही होती ऑफरगेल्या ३० ते ३५ वर्षांच्या राजकीय जीवनात मला आजपर्यंत सर्व समाजाने मदत केली. काँग्रेसमध्येही मला खूप मानसन्मान मिळाला. परंतु राजकारण करताना परिस्थिती अशी होते की त्यावेळी पक्ष बदलावा लागतो. आपण ज्या भागाचे प्रतिनिधित्व करतो, त्या भागातील लाेकांच्या समस्या सुटल्या पाहिजेत, हा मूळ उद्देश असतो. मला शिंदेसेनेकडूनही ऑफर होती. परंतु राष्ट्रवादी हा सेक्युलर पक्ष असल्यामुळे मी राष्ट्रवादीची निवड केली, अशी प्रतिक्रिया माजी खासदार भास्करराव खतगावकर यांनी दिली.

टॅग्स :NandedनांदेडAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस