उमरी येथे आयपीएलवर सट्टा; तिघांविरूद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 03:26 PM2018-05-11T15:26:01+5:302018-05-11T15:26:01+5:30

आयपीएल टी-२० या क्रिकेट सामन्यावर बेटींग लावून सट्टा खेळणाऱ्या तीन जणांविरूद्ध उमरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

betting on IPL; Trial against the three accused | उमरी येथे आयपीएलवर सट्टा; तिघांविरूद्ध गुन्हा दाखल

उमरी येथे आयपीएलवर सट्टा; तिघांविरूद्ध गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देसहाय्यक पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी १० मे रोजी मध्यरात्री ही कारवाई केली़ ६ लाख ८० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

उमरी (नांदेड ) : आयपीएल टी-२० या क्रिकेट सामन्यावर बेटींग लावून सट्टा खेळणाऱ्या तीन जणांविरूद्ध उमरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

सहाय्यक पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी १० मे रोजी मध्यरात्री ही कारवाई केली़ गुप्त माहितीच्या आधारे हसन यांनी धर्माबाद, उमरी, कुंडलवाडी व दंगा नियंत्रण पथकाच्या कर्मचाऱ्यांसह उमरी रेल्वे स्थानकाजवळील एका गल्लीत धाड टाकली़  यावेळी एका घरातून आयपीएल बेटींग सट्टा जुगाराचे साहित्य, ज्यात दोन एलईडी टीव्ही, एक लॅपटॉप व १५ मोबाईल प्रिंटर, सीमकार्ड तसेच इतर जुगाराचे साहित्य व नगदी रक्कम असा एकूण ६ लाख ८० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तसेच सय्यद सादक, सय्यद सादिक (दोघे रा़ इस्लामपूरा, उमरी) व शेख मुजीब या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले़ त्यांच्याविरूद्ध मुंबई जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला़ सदर बेटींग दरम्यान उमरी शहरातील व धर्माबाद येथील आयपीएल बेटींग सट्टा लावणाऱ्या इतर इसमांचा शोध घेण्यासाठी कार्यवाही सुरू आहे़ पो़नि़ संदीपान शेळके या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Web Title: betting on IPL; Trial against the three accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.