नियमबाह्यपणे घेतला योजनेचा लाभ; ९ हजार ९८५ शेतकऱ्यांना परत करावे लागणार ७ कोटी ७३ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 06:45 PM2020-10-30T18:45:30+5:302020-10-30T18:48:55+5:30

दोन हजार प्रती महिन्याप्रमाणे चार महिन्यांच्या अंतराने तीन समान हप्त्यात जिल्ह्यातील 445584 शेतकऱ्यांना पैसे देण्यात आले.

The benefit of the scheme taken illegally; 9 crore 985 farmers will have to repay 7 crore 73 lakhs | नियमबाह्यपणे घेतला योजनेचा लाभ; ९ हजार ९८५ शेतकऱ्यांना परत करावे लागणार ७ कोटी ७३ लाख

नियमबाह्यपणे घेतला योजनेचा लाभ; ९ हजार ९८५ शेतकऱ्यांना परत करावे लागणार ७ कोटी ७३ लाख

Next
ठळक मुद्देआतापर्यंत १८ हजार रुपये वसुलीही जिल्ह्यात पूर्ण झाली आहे. साडेसहा हजार करदात्यांनीही घेतला लाभ

नांदेड : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जिल्ह्यात सहा टप्प्यात ४ लाख ४५ हजार ५८४ शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. मात्र  अनेक करदात्या शेतकरी व अपात्र असलेल्या शेतकऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेतला आहे. ही बाब स्पष्ट झाल्यानंतर जिल्ह्यातील ९ हजार ९८५ शेतकऱ्यांकडून रक्कम परत घेतली जाणार आहे. आतापर्यंत १८ हजार रुपये वसुलीही जिल्ह्यात पूर्ण झाली आहे. 

या योजनेचा लाभ धनदांडग्यांनीही घेतल्याची बाब इतर राज्यात उघडकीस आल्यानंतर तपासणी करण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यात कर दाते असलेले ६ हजार ६१८ तर अपात्र असलेल्या ३ हजार ३७६ लाभाथ्यार्ंनी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रक्कमेचा लाभ घेतल्याची बाब स्पष्ट झाली आहे. ही रक्कम आता वसूल करण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे.

अपुऱ्या कागदपत्रामुळे  शेतकरी अपात्र
 जिल्ह्यात सदर योजनेअंतर्गत ४ लाख ५ हजार ५८४ पात्र ठरले तर ३ हजार ३७६ शेतकरी अपात्र ठरले आहेत.तपासणीमध्ये करदाते शेतकऱ्यांसह सदर योजनेत कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे अपात्र ठरले आहेत. शेती नसतानाही सदर योजनेसाठी अर्ज भरल्याच्या बाबीही पुढे आल्या

साडेसहा हजार करदात्यांनीही घेतला लाभ
जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत ६ हजार ६१३ जणांनी करदाते असूनही लाभ घेतल्याची बाब पुढे आली आहे. यामध्ये सर्वाधिक शेतकरी हे मुखेड तालुक्यातील आहेत. 

रकमेची वसुली सुरू
जिल्ह्यात अपात्र असलेल्या लाभाथ्यांनाही रक्कम वाटप झाल्यानंतर ती वसुली सुरू झाली आहे. या वसुलीसाठी मोहीमच हाती घेतली जाणार आहे.

Web Title: The benefit of the scheme taken illegally; 9 crore 985 farmers will have to repay 7 crore 73 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.