शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होणार नाही याची दक्षता घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 12:49 AM

भाजप सरकारच्या काळात अल्पसंख्याकासह बहुजन समाजावरील अन्यायात वाढ झाली आहे. त्यामुळे भाजपाला सत्तेबाहेर काढण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे मतदारांनी काँग्रेसच्या पाठीशी राहावे, असे आवाहन माजी मंत्री आ. मोहंमद आरिफ नसीम खान यांनी केले.

ठळक मुद्देआरिफ खान यांचे आवाहन

नांदेड : भाजप सरकारच्या काळात अल्पसंख्याकासह बहुजन समाजावरील अन्यायात वाढ झाली आहे. त्यामुळे भाजपाला सत्तेबाहेर काढण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे मतदारांनी काँग्रेसच्या पाठीशी राहावे, असे आवाहन माजी मंत्री आ. मोहंमद आरिफ नसीम खान यांनी केले. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होणार नाही याची दक्षता घ्यायला हवी अन्यथा या विभाजनाचा भाजपालाच फायदा होईल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.नसिम खान हे शनिवारी नांदेडमध्ये काँग्रेस प्रचारार्थ आले होते. नवामोंढा येथील पक्ष कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपच्या ध्येयधोरणावर त्यांनी कडाडून टीका केली. गेल्या पाच वर्षांच्या काळात केंद्र आणि राज्यात भाजप सरकारने अल्पसंख्याक समाजावर मोठा अन्याय केला आहे. त्याचवेळी दलित, ओबीसी, मागासवर्गीय समाजावरही हीच परिस्थिती होती. त्यामुळे अल्पसंख्याकांसह दलित, बहुजन हे काँग्रेससोबत असल्याचा दावाही नसीम खान यांनी केला.वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा करुनही अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी निर्णय घेतला नाही. वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असली तरीही त्याचा काँग्रेसवर परिणाम होणार नाही, असेही ते म्हणाले. त्याचवेळी बहुजन समाज पक्ष, समाजवादी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडीकडून आरएसएस बाबत चुप्पी साधली आहे. दुसरीकडे काँग्रेसवर मात्र टीका केली जात आहे. केंद्रातील व राज्यातील भाजपचे सरकार आरएसएस चालवत असल्याचा आरोपही त्यांनी केला.भाजप सरकारने सत्तेत आल्यानंतर शादीखाना योजना, उर्दू घरांची संकल्पना बंद केली आहे. मुस्लिम समाजातील अनेक बिरादरींचे आरक्षण रोखले आहे. मुस्लिम आणि मराठा समाजाने आरक्षणासाठी लाखोंचे मोर्चे काढले होते. तरीही मुस्लिमांना आरक्षण दिले नाही. धनगर समाज भाजपासोबत होता. मात्र आरक्षणाच्या विषयावरुन तो आता भाजप सरकारवर नाराज आहेत. या परिस्थितीत भाजपाला धडा शिकविण्याच्या तयारीत मतदार दिसून येत आहेत. मात्र मतदान करताना पुरोगामी धर्म निरपेक्ष विचारांच्या मतांचे विभाजन होणार नाही आणि याचा फायदा पुन्हा जातीयवादी शक्तींना मिळणार नाही, याची दक्षता घ्या, असे ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला लियाकत अन्सारी, अब्दुल हाफीज, जमी कुरेशी, सलाम चावलवाला, स्थायी समितीचे सभापती फारुख अली खान, प्रवक्ते संतोष पांडागळे, मुंतजीब आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :NandedनांदेडElectionनिवडणूकSocialसामाजिकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक