शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
2
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
3
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद BJP कडे ठेवले, २० वर्षांनंतर गृह खाते सोडले
4
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
5
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
6
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
7
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
8
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
9
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
10
भाजपा-शिंदे गटात वाद, चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले; म्हणाले, “कारवाई करू, आमचे संस्कार...”
11
Travel : अवघ्या ३ दिवसात फिरता येईल 'हा' सुंदर देश; भारताचे १०००० होतील तब्बल ५८०००! फिरण्यासाठी बेस्ट
12
"बँक खात्यात ५ लाख आले, तरीही म्हणाला आणखी पैसे लागतील"; डॉ. आदिलच्या whatsApp चॅटमध्ये काय काय?
13
केरळ, यूपीसह अनेक राज्यात SIR ला आव्हान; सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला मागितले उत्तर...
14
मोठी बातमी! इस्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतान्याहून भारत दौऱ्यावर येणार, जुनी दोस्ती आणखी घट्ट होणार
15
Local Body ELection: दोंडाईचा नगरपालिका निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय, नगराध्यक्ष आणि सर्वच २६ नगरसेवक बिनविरोध!
16
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
17
रात्री लाईट ऑन करून झोपण्याची सवय असेल तर आताच बदला, आरोग्याचं होईल मोठं नुकसान
18
IND A vs BAN A 1st Semi Final : १२ चेंडूत ५० धावा! बांगलादेशनं भारतीय संघासमोर ठेवलं मोठं टार्गेट
19
ना थांबा, ना विश्रांती… गरुडाचा ६१०० किलोमीटर प्रवास थक्क करणारा; आशियातून आफ्रिकेत ६ दिवसांत पोहोचला
20
पाच वर्ष लपूनछपून डेटिंग, मग भरमैदानात प्रपोज... अशी फुलली स्मृती मंधाना-पलाशची Love Story
Daily Top 2Weekly Top 5

काळजी घ्या ! मे महिन्यात मराठवाड्यातील कोरोना रुग्णसंख्या दीड लाखापुढे जाण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 18:46 IST

corona patients rise in Marathwada आरोग्य विभागाने सांगितल्यानुसार रुग्णवाढ झाल्यास मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात १७ हजार ७०० आयसोलेशन खाटा कमी पडतील.

ठळक मुद्देऑक्सिजन, आयसीयू खाटासह व्हेंटीलेटर्स वाढविण्याची गरज २ मे रोजी औरंगाबाद जिल्ह्यात सक्रिय रुग्णसंख्या ३० हजार ७३१ असण्याची शक्यता आहे.

- विशाल सोनटक्के

नांदेड : मराठवाड्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. येणाऱ्या दिवसात रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची भीती असून, २ मेपर्यंत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील रुग्णसंख्या १ लाख ५८ हजाराहून अधिक होईल, अशी शक्यता आरोग्य विभागानेच वर्तविली आहे. रुग्णवाढीमुळे आयसोलेशन, ऑक्सिजन आणि आयसीयू खाटासह व्हेंटीलेटर्स कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तातडीने आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर द्यावा लागणार आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे रौद्ररूप सध्या मराठवाड्यासह महाराष्ट्र अनुभवत आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत सध्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून, मृत्यूदरही वाढलेला आहे. आरोग्य विभागाने ज्या पाच जिल्ह्यांच्या मृत्यूदराबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यामध्ये नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे. नांदेडचा मृत्यूदर मागील आठवड्यात १.८२ टक्केवर गेला होता. साप्ताहिक पॉजिटीव्हीटीमध्येही उस्मानाबादसह हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांची परिस्थिती चिंताजनक आहे. उस्मानाबादचा सर्वाधिक ३९.२५ टक्के पॉजिटीव्हीटी रेट होता. तर परभणी ३६.७८ आणि हिंगोलीचा रेट ३६.७० असा आढळला आहे. या तीनही जिल्ह्यांनी याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. त्यातच येणाऱ्या दिवसात मराठवाड्यातील सक्रिय रुग्ण संख्या सध्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली असून २ मेपर्यंत हा आकडा १ लाख ५८ हजाराच्या पुढे जाण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसे झाल्यास आयसोलेशन ऑक्सिजन, आयसीयूसह व्हेंटीलेटर्सचीही मोठ्या प्रमाणात कमतरता पडू शकते. आरोग्य विभागाने सांगितल्यानुसार रुग्णवाढ झाल्यास मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात १७ हजार ७०० आयसोलेशन खाटा कमी पडतील. तर ८ हजार ६३० ऑक्सिजन खाटासह ११४५ आणखी आयसीयू खाटांची गरज भासू शकते. याबरोबरच २०९ व्हेटीलेटर्स आणखी उपलब्ध करावे लागणार आहेत. आरोग्य विभागाने वर्तविलेला हा अंदाज पाहता मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात आणखी आरोग्य सुविधा वाढविण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

रुग्णवाढीचा असा आहे अंदाज...राज्याच्या आराेग्य विभागाने मराठवाड्यातील सक्रिय रुग्णांची संख्या २ मेपर्यंत सुमारे १ लाख ५८ हजारांच्या पुढे जाईल, असा अंदाज वर्तविला आहे. २ मे रोजी औरंगाबाद जिल्ह्यात सक्रिय रुग्णसंख्या ३० हजार ७३१ असण्याची शक्यता आहे. तर जालना १५ हजार ९५६, बीड १९ हजार ५३६, लातूर ३६ हजार ८९८, परभणी २२ हजार ६३९, हिंगोली ४ हजार ४१९, नांदेड २८ हजार ४० तर उस्मानाबाद जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या २ मेपर्यंत १० हजार २७७ पर्यंत राहण्याचा अंदाज आहे.

सध्याच ऑक्सिजनसह आयसोलेशन खाटा फुल्ल...मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढलेली आहे. नांदेड जिल्ह्यात एकूण आयसोलेशन खाटांच्या १७९.३६ टक्के वापर होत आहे. परभणी १४४.९२, हिंगोली ७९.५०, औरंगाबाद ७३.०४, बीड ४६.६७, उस्मानाबाद ४६.२२, लातूर ४४.९३ तर जालना जिल्ह्यातील २७.२८ टक्के आयसोलेशन खाटा भरलेल्या आहेत. हिंगोलीत एकूण खाटांच्या तुलनेत १२६.६७ टक्के व्हेंटीलेटर्स वापरले जात आहेत. तर औरंगाबाद १०४.५७, लातूर ७४.७७, जालना ६०.१६, उस्मानाबाद ४७.६६, बीड १७.३३ तर नांदेड जिल्ह्यात एकूण खाटांच्या तुलनेत १५.३८ टक्के व्हेंटीलेटर्सचा वापर करण्यात येत आहे.

आरोग्य विभागाच्या अहवालानुसार उपाययोजनाराज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने कोविडची सद्यस्थिती दर्शवत पुढील दिवसांतील अंदाज व्यक्त करणारा अहवाल दिला आहे. त्यात त्यांनी सुचविल्याप्रमाणेच सध्या उपाययोजना करण्यात येत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आरोग्य साधनांची स्थिती काय आहे, हे या अहवालात सांगण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन, आयसीयू आणि आयसोलेशन बेडची संख्या वाढविली आहे. ग्रामीण भागात काही नव्या कोविड सेंटरचे काम सुरू असून, ते अंतिम टप्प्यात आहे. ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत झाला असून, रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा आहे. मात्र आरोग्य मंत्र्यांनी सांगितल्यानुसार पुढच्या काही दिवसात तोही सुरळीत होईल. - डॉ. विपिन ईटनकर, जिल्हाधिकारी, नांदेड.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबादNandedनांदेड