बार चालकाला महिलांनी पिटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 01:15 AM2018-11-24T01:15:45+5:302018-11-24T01:16:32+5:30

कौठा परिसरात नव्याने सुरु करण्यात येणाऱ्या बारच्या विरोधात या परिसरातील नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत गुरुवारी बारच्या फलकाची तोडफोड केली होती़ त्यानंतर दिवसभर या बारला टाळेच होते़

The bar driver beat the women | बार चालकाला महिलांनी पिटाळले

बार चालकाला महिलांनी पिटाळले

Next

नांदेड : कौठा परिसरात नव्याने सुरु करण्यात येणाऱ्या बारच्या विरोधात या परिसरातील नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत गुरुवारी बारच्या फलकाची तोडफोड केली होती़ त्यानंतर दिवसभर या बारला टाळेच होते़ शुक्रवारी सकाळी बारचालक पुन्हा या ठिकाणी आला असता, संतप्त महिलांनी या बारचालकाला पिटाळून लावत दिवसभर बारसमोरच ठिय्या दिला़
जुना कौठा परिसरातील दत्तनगर भागात मुख्य रस्त्यावर बार सुरु करण्यात येत आहे़ बारचालकाने सुरुवातीला नागरिकांच्या संमतीसाठी या ठिकाणी हॉटेल टाकत असल्याचे सांगितले होते़ परंतु,त्यानंतर दुरुस्तीचे काम करीत बारच्या नावाची पाटी लागल्यावर या परिसरातील नागरिक अवाक् झाले़ या भागातील नगरसेवक राजू काळे, राजू गोरे यांच्यासह नागरिकांनी बारचालकाची भेट घेवून बार सुरु न करण्याची विनंती केली़ परंतु, ही विनंती धुडकावत गुरुवारी बार सुरु करण्याचा प्रयत्न केला़ त्यानंतर शुक्रवारी बारचालकाला महिलांनी पिटाळून लावले़

Web Title: The bar driver beat the women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.