शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
2
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
3
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
4
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
5
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
6
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
7
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
8
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
9
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
10
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
11
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
12
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
13
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
14
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
15
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
16
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
17
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
18
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
19
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
20
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं

बँक घोटाळा प्रकरणी उच्च न्यायालयात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 12:23 AM

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नियमबाह्यपणे कर्ज वाटप व इतर प्रकरणांतून ५५७ कोटींचा गैरव्यवहार करण्यात आला होता़ या प्रकरणात नांदेड जिल्हा सत्र न्यायालयाने ठपका असलेल्या संचालकावर गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले होते़

ठळक मुद्दे५५७ कोटींचा गैरव्यवहार जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशाला खंडपीठात आव्हान

नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नियमबाह्यपणे कर्ज वाटप व इतर प्रकरणांतून ५५७ कोटींचा गैरव्यवहार करण्यात आला होता़ या प्रकरणात नांदेड जिल्हा सत्र न्यायालयाने ठपका असलेल्या संचालकावर गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले होते़ त्या आदेशावर संचालकांनी पुनर्विचार याचिका दाखल केली होती़ न्यायालयाने ही याचिका मान्य करीत संचालकांना दिलासा दिला होता़ सत्र न्यायालयाच्या या आदेशाला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आल्याची माहिती अ‍ॅड़आऱ एऩ कच्छवे यांनी दिली़अ‍ॅड़ कच्छवे म्हणाले, जिल्हा बॅकेत २००० ते २००५ या काळात नोकरभरती, संगणक खरेदी, नियमबाह्य कर्जवाटप, आगाऊ वेतनवाढ, साखर कारखान्यांना विनातारण कर्ज अशाप्रकारे कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला होता़ विशेष लेखा परीक्षक ए़एसग़ंभीरे यांनी लेखा परीक्षणात या सर्व संचालकांना दोषी ठरविले होते़ त्यानंतर पुन्हा फेर लेखा परीक्षण करण्यात आले़ त्यामध्ये मात्र गंभीरे यांनी सर्व २७ संचालकांना दोषमुक्त ठरविले़त्यामुळे याविरोधात बँक बचाव कृती समितीचे अध्यक्ष व माजी आ़ डॉ़ डी़ आऱ देशमुख यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली होती़ लोकायुक्तांनी पोलीस चौकशी करण्याचे आदेशही दिले होते़ परंतु पोलिसांनी या चौकशीकडे दुर्लक्ष केले़ या घोटाळ्यामुळे २००५ ते २०१६ असे ११ वर्षे बँकेचे व्यवहार ठप्प होते़ ठेवी परत न मिळाल्यामुळे जिल्ह्यातील ३५० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या़ या प्रकरणात क्रांतीकारी जयहिंद सेनेचे संभाजी पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती़ उच्च न्यायालयाने हे प्रकरण नांदेड न्यायालयाकडे वर्ग केले होते़ न्यायालयाने सुनावणी घेवून ठपका असलेल्या २७ संचालकांविरुद्ध १० सप्टेंबर रोजी गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले होते़ परंतु, हाकेच्या अंतरावर असलेल्या वजिराबाद पोलीस ठाण्यात हे आदेश पोहोचण्यासाठी तब्बल दहा दिवस लागले़ याच दरम्यान, बँकेच्या संचालकांनी न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली़ पुनर्विचार याचिकेच्या प्रत्येक सुनावणीच्या वेळी वेगवेगळ्या संचालकांकडून याचिका दाखल करण्यात येत होत्या़ २ जानेवारीला संचालकांच्या याचिका मान्य केल्या होत्या़ त्यामुळे संचालकांना दिलासा मिळाला होता़ जिल्हा सत्र न्यायालयाच्या या आदेशाला संभाजी पाटील यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे़ या प्रकरणात पुढील आठवड्यात सुनावणी घेण्याची विनंती करणार असल्याचे अ‍ॅड़ कच्छवे म्हणाले़घोटाळेबाजांना निवडणुकीत शिकवा धडा

  • बँक बचाव कृती समितीच्या माध्यमातून येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बँक बुडविणारे किंवा त्यांच्या पाल्यांना सभागृहात जाता येणार नाही, यासाठी प्रयत्न करण्यात येतील़ बँकेचे ग्राहक शेतकरी आणि समितीचे सदस्य या नेत्यांच्या विरोधात प्रचार करतील, अशी माहिती कृती समितीचे अध्यक्ष माजी आ़डॉ़डी़आऱदेशमुख यांनी दिली़
  • बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेतील घोटाळा प्रकरणात उच्च न्यायालयाने एसआयटी नेमून चौकशीचे आदेश दिले होते़ जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळ्यातही तशाच प्रकारचे आदेश होण्याची खात्री असल्याचे अ‍ॅडक़च्छवे म्हणाले़
टॅग्स :NandedनांदेडAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठBanking Sectorबँकिंग क्षेत्र