शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

पाकी काळाडोह, जाकापूर साठवण तलावालाही उपलब्धता प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 00:19 IST

रेणापूर-सुधा प्रकल्पाची उंची वाढविणे व पिंपळढव येथील साठवण तलावाची निर्मिती करणे यासाठीचे शासनाचे दोन दिवसांपूर्वीच पाणी उपलब्धता प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. त्यानंतर आता भोकर तालुक्यातील पाकी काळाडोह व जाकापूर साठवण तलावाच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेले पाणी उलब्धता प्रमाणपत्रही मिळाले आहे.

ठळक मुद्देभोकरवासियांना दिलासा अशोक चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यशभोकर तालुक्याचा पाणीप्रश्न लागणार मार्गी

नांदेड : रेणापूर-सुधा प्रकल्पाची उंची वाढविणे व पिंपळढव येथील साठवण तलावाची निर्मिती करणे यासाठीचे शासनाचे दोन दिवसांपूर्वीच पाणी उपलब्धता प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. त्यानंतर आता भोकर तालुक्यातील पाकी काळाडोह व जाकापूर साठवण तलावाच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेले पाणी उलब्धता प्रमाणपत्रही मिळाले आहे. मागील काही वर्षांपासून सुरु असलेल्या प्रयत्नांचे हे यश असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सांगितले असून, यामुळे भोकर तालुक्याचा पाणीप्रश्न मिटेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.भोकर तालुक्यातील पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी अशोकराव चव्हाण यांच्यासह आ. अमिताताई चव्हाण मागील काही वर्षापासून पाठपुरावा करत आहेत. तालुक्यातील सिंचन प्रकल्पाच्या निर्मितीमध्ये पाणी उपलब्धता प्रमाणपत्र हाच मोठा अडसर ठरत होता. यासाठी वेगवेगळ्या पातळ्यावर लढाई लढण्यात आली. राज्याच्या एकात्मिक जल आराखड्यास शासनाने नुकतीच मान्यता दिली आहे. या आराखड्यामध्ये सर्वात आधी मध्य गोदावरी खोऱ्यातील मराठवाड्याच्या हक्काचे २९.८१ टीएमसी पाणी मिळाले. त्यामुळे मराठवाड्यातील अनेक प्रकल्प मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.२९.८१ टीएमसी पाण्यापैकी १७ दलघमी पाणी भोकर तालुक्याच्या सुधा उपखोºयाच्या वाट्याला आले. त्यातून भोकर तालुक्यातील अनेक लघु मध्यम प्रकल्प मार्गी लागणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रेणापूर-सुधा प्रकल्पाची उंची वाढविणे व पिंपळढव आणि दिवशी येथील साठवण तलाव निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेले पाणी उपलब्धता प्रमाणपत्र नाशिकच्या नियोजन व जल विज्ञान विभागाकडून नुकतेच मिळाले.हे प्रमाणपत्र अशोकराव चव्हाण यांनी पिंपळढव येथील एका कार्यक्रमात ग्रामस्थांच्या उपस्थितीत सरपंचांना सुपूर्द केले. गावकऱ्यांनीही या निर्णयाचे पेढे वाटून स्वागत केले. या घटनेस २४ तास उलटले नाहीत तोच पाकी काळाडोह व जाकापूर येथील साठवण तलावासाठी आवश्यक असलेले पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळवून घेण्यात यश मिळाले आहे.

मराठवाड्यासह नांदेड जिल्ह्याला पाण्याची उपलब्धता रहावी, यासाठी काँग्रेसचे दिवंगत नेते शंकरराव चव्हाण यांनी मोठे काम केले आहे़ सिंचनाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी माझाही अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे़ या पाठपुराव्याला यश मिळाले असून नुकत्याच मिळालेल्या पाणी उपलब्धता प्रमाणपत्रामुळे भोकर तालुका अधिक सुजलाम होईल, असा विश्वास वाटतो़ -अशोक चव्हाण

 

टॅग्स :NandedनांदेडAshok Chavanअशोक चव्हाणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पDamधरण