दोन दुचाकी केल्या लंपास
नांदेड- जिल्ह्यात लोहा आणि भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन दुचाकी लंपास करण्यात आल्या आहेत. माधव ज्ञानेश्वर पांचाळ यांनी एम.एच. २६, बीएम ६६७२ या क्रमांकाची दुचाकी गोल्डन सिटी लोहा येथे लावली होती. ही दुचाकी लांबविण्यात आली. तर भाग्यनगर हद्दीत भावसार चौक येथून मलहू कोरी यांची एम.एच. २६, एझेड ८२२३ या क्रमांकाची दुचाकी चोरट्याने लंपास केली. या प्रकरणात संबधित पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद झाले.
५० हजारासाठी बेल्टने मारहाण
नांदेड - दुचाकी घेण्यासाठी माहेराहून ५० हजार रुपये घेऊन येण्याची मागणी करीत विवाहितेला बेल्टने मारहाण करण्यात आली. ही घटना परभणी जिल्ह्यातील पोखर्णी येथे घडली. पैशासाठी विवाहितेला उपाशीपोटी ठेवून घराबाहेर हाकलण्यात आले. या प्रकरणात अर्धापूर पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळीच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
धर्माबाद येथे जुगार अड्ड्यावर धाड
नांदेड - धर्माबाद शहरात एका दुकानात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. नुकतीच कारवाई करण्यात आली. दुकानात मटका सुरू होता. पोलिसांनी या ठिकाणाहून दीड हजार रुपये जप्त केले. या प्रकरणात धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.